बारामती शहरातील मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा बंदोबस्त करा,बारामतीकरांची मागणी..
बारामती:- बारामती शहरामध्ये सहसा रस्त्यावर मोकाट जनावरे व कुत्री यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे, याचा सामान्य नागरिकांना
मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा
जनावरांच्या हल्ल्यामध्ये जीव गमवावा लागणार तर नाही ना ही भीती निर्माण होऊ लागली आहे, त्यामुळे बारामती नगरपालिकेने शहरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी बारामतीतील नागरिक करीत आहे.लवकरच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी
यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे,
शहरातील उदा. वसंतनगर टी. सी. कॉलेज रोड,चंद्रविजय सोसायटी लगत कॉलेज रोड वर कुत्र्याचा ताफा असतो,सकाळी फिरायला जाणाऱ्यांची व व्यायामाला जाणारे तसेच शाळा, कॉलेज ला जाणाऱ्या मुले व नागरिकांच्या अंगावर या कुत्र्याची झुंड तुटून पडतो तर अनेकांचे टूव्हिलर गाड्या पडून अपघात झाले आहे,अशा जनावरांचा बंदोबस्त होण्याबाबत
नगरपालिकेला अनेक वेळा कळविण्यात आले
आहे. परंतु नगरपालिका या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा बेवारस जनावरांचा बंदोबस्त
करण्यासाठी बारामती नगरपालिकेकडून ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे का ?. ठेकेदाराकडून जनावरे पकडली जात आहेत का? ठराविक ठिकाणी सोडून सुद्धा दिली जात आहेत का?असा प्रश्न पडला आहे, परंतु अवघ्या 2-3 दिवसांमध्ये हिच कुत्री व जनावरे पुन्हा शहरातील गल्ल्यांमध्ये आढळून येतात. काही पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे येथील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व्यक्ती यांचा जीव धोक्यात येण्याचीशक्यता आहे. रात्रीच्या वेळेस तर कुत्रि झुंडीने येऊन एखाद्यावर हल्ला करतात. या जनावरांच्या हल्ल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक,लहान मुले अनेक वेळा जखमी झालेले आहेत. अशा घटनांमध्ये जर एखाद्याला आपला जीव गमवावा लागला तर नगरपालिकेवर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपालिके कडे अनेक जागा उपलब्ध असताना अशा जागांमध्ये मोकाट जनावरांच्या कोंडवाड्याची व्यवस्था करावी, अशी
मागणी होत आहे.नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन हा विषय मार्गी लावावा मागणी नागरिकांकडून व सामाजिक संघटनांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment