उत्तम आरोग्यासाठी महिलांनी सजग असणे महत्वाचे; स्वानंदी रथ -देशमुख ..
बारामती:- २८ मे मासिक पाळी स्वछतादिनानिमित्त रागिनी फाऊंडेशन व जागृती फाऊंडेशन यांचा अभिनव उपक्रम बारामती येथील रागिनी फाऊंडेशन व जागृती फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तांदुळवाडी परिसरातील महिला व किशोरवयीन युवतींसाठी मासिक पाळी स्वछतादिनानिमित्त उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिला व मुलींना मासिक पाळी स्वच्तादिनाचे महत्व सांगण्यात आले, किशोरवयोन युवतींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे,अजूनही समाजात मासिकपाळी बद्दल असलेल्या गैरसमजांमुळे महिला व मुलींना अतिशय निकृष्ट दर्जाची वागणूक दिली जाते. , त्यामु्ळे अनेक मुलींना, महिलांना मासिक पाळीच्या पाच दिवसांत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, समाजाने या विषयावर जागृत राहून विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच उत्तम आरोग्यासाठी महिलांनी सजग असणे महत्वाचे आहे. योग्य आहार,व्यायाम व योग्य वेळी आवश्यक तपासण्या करून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणे प्रत्येक महिलेसाठी महत्वाचे आहे, असे मत जागृती फाऊंडेशनच्या संचालिका स्वानंदी रथ यांनीव्यक्त केले. तसेच त्यांनी उपस्थित महिलावर्गाला कचऱ्याची वर्गवारी कारण्यासाठी 'रेड डॉट' कॅम्पेन जागृती फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात कशी राबवली जाते याबद्दल माहिती दिली.
'' हे अफाट विश्व निर्माण करण्याची शक्ती फक्त एका स्त्रीतचं आहे, मग एका स्त्रीला येणारी मासिक पाळी अपवित्र नाही, म्हणूनच तिचा सन्मान हाच आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा सन्मान असेल.आणि स्त्रीचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे'' असे मत रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी व्यक्त केले. यावेळी तांदुळवाडी व परिसरातील महिला व किशोरवयीन मुलींना ३०० पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिन पॅकेट वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका वनिता जाधव,उमा जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले .तर या कार्यक्रमासाठी श्रुतिका आगम,मैत्रीयी जमदाडे ,सुजाता लोंढे यांनी योगदान दिले.
No comments:
Post a Comment