स्पीड ब्रेकर जेवढा फायद्याचा तेवढाच धोक्याचा झालाय..! बारामती(संतोष जाधव):- बारामती विकसित होत चाललेली दिसत आहे तर रस्त्याची कामेही दिसत आहे तर काही भागात रस्त्याची दुरवस्था झालेली दिसत आहे तश्या नागरिकांच्या तक्रारी आहे पण प्रशासनाला त्याकडे पाह्यला वेळ नाही. तर ज्या भागात मुख्यतः फलटण रोड, माळेगाव रोड, पाटस रोड अश्या अनेक ठिकाणी रस्त्यावर स्पीड ब्रेकर आहेत पण त्यावर पांढरे पट्टे न मारल्याने अनेक अपघात झाले तर बळीही गेला आहे,वाहन चालकाला रस्त्यावर असणारे स्पीड ब्रेकर दिसत नाही, पांढरे पट्टे असते तर वाहनाचा स्पीड कमी केला जातो पण पांढरे पट्टे नसल्याने भरधाव चालणारे वाहन अचानक स्पीड ब्रेकर वर आपटते तर त्याच्या पाठीमागून येणारे वाहन एकमेकांना धडकले जातात हे नेहमीच पाहायला मिळत आहे यामध्ये अनेक जण जखमी झाले तर काहीचा बळी देखील गेला आहे, नुकताच फलटण रोड चौक ते कारभारी चौक कडे जाणाऱ्या टू व्हीलर वरील पाठीमागील बसलेली महिला पडली आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रक खाली गेल्याने जीव गेला अश्या अनेक घटना घडल्या आहे, आत्ता तरी प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का? की आणखी बळी जाण्याची वाट पाहणार आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे तर दुसरीकडे जिथे स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारलेत तिथे काहीसा अपघात कमी झाल्याचे कळते, तर काही ठिकाणी उदाहरण कदम चौक ते खंडोबा नगर रोड वर असणाऱ्या स्पीड ब्रेकर जे मोठ्या प्रमाणात बसविले आहे की ज्यामुळे वाहने आपटली जातात तर सायलन्सर फुटले आहे काही गाड्या पलटी झाल्या आहेत, अश्या पद्धतीने कामे झाली असतील तर जिथे गरज तिथे कामे होत नाही यामुळे नागरिकांच्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तरी त्वरित लक्ष देऊन स्पीड ब्रेकर वर पांढरे पट्टे मारावीत अशी मागणी पत्रकार संतोष जाधव करणार असल्याचे सांगितले.
Post Top Ad
Saturday, May 28, 2022
स्पीड ब्रेकर जेवढा फायद्याचा तेवढाच धोक्याचा झालाय..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment