उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा परीक्षा नियमानुसार घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनचा इशारा देताच परीक्षा पुढे ढकलल्या.. बारामती:- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती महाविद्यालयातील पदव्युत्तर परीक्षा या महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 27 एप्रिल 2022 च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा नियमानुसार घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू अश्या इशाराचे पत्र देण्यात आले,आपली संस्था ही स्वायत्त संस्था असल्यामुळे आम्ही तुम्हाला नम्रपणे परीक्षाही शासनाच्या नियमानुसार व्हावी कारण स्वायत्त संस्था असल्यामुळे काही अधिकार कॉलेजला आहे. म्हणून विद्यार्थ्यांची अशीही मागणी आहे पेपर शासनाच्या नियमाप्रमाणे झाले पाहिजे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही कोरोनामुळे काहींचे पालक आजारी होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळाला नाही घरात लक्ष द्यायचं का अभ्यासात लक्ष द्यायचं हे विद्यार्थ्यांना समजत नव्हते तरी कॉलेजनी आमची मागणी स्वीकारावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा कॉलेज समोर आंदोलन करण्यात येईल हा इशारा देण्यात आला होता,नवीन विद्यापीठ कायदा एक मार्च 2017 पासून लागू झाला आहे.त्यामध्ये अभ्यास मंडळामध्ये गतवर्षी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सदस्य म्हणून घोषित केले जातील नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांचे मत कलम 40 (2) ड यामध्ये तसे नमुद आहे. म्हणून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे मत जाणून परीक्षा पुणे ढकल्यावात अशी आमची मागणी आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा संजय (नाना) दराडे , साजन अडसुळ, सचिन मोरे यांनी केले होते याची दखल घेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांना दुपारी पत्र दिले आणि आंदोलनाचा इशारा देताच परीक्षा पुढे ढकलण्याची आमची मागणी मान्य केली असल्याचे सांगण्यात आले तर अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती.(स्वायत्त महाविद्यालय)यांनी नोटीस जाहीर केली,
पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांकरीता
शुक्रवार दि.२०/०५/२०२२ पासून एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. एम.एस्सी. (कॉम्प्युटर
सायन्स), एम. व्होक., बी.लिब., एम. लिब. व डी.टी.एल. या वर्गांच्या लेखी परीक्षा सुरु होणार
होत्या.सदर परीक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे दि. ०१/०६/२०२२ पासून सुरु करण्यात येत
आहेत. सविस्तर वेळापत्रक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच अधिकृत टेलिग्राम ग्रुपवर
प्रसिद्ध केले आहे.यापूर्वीच्या वेळापत्रकासंबंधी च्या नोटीस क्र. ५७, ५८,५९,६० या रद्द समजण्यात याव्यात.तरी, संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी नवीन वेळापत्रका संबंधी गांभीर्याने नोंद घ्यावी.असे प्राचार्य व महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी नोटीस द्वारे कळविले.
No comments:
Post a Comment