लोणी - धामणी ते पुणे शहर बस बंद करू नका ग्रामस्थांची मागणी..
लोणी धामणी (पियुष गायकवाड आंबेगाव प्रतिनिधी):- लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. या गावातून शिक्रापुर ते पुणे अशी पी एम पी एल ची बस सेवा सुरू असून, ती बंद करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंबेगाव च्या पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगाव पीर, खडकवाडी वाळुंज नगर,रानमळा
पहाडदरा, शिरदाळे, सविंदणे लाखनगाव, पोंदेवाडी या भागातील जनतेला या सेवेचा लाभ मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी सेवा सुरू झाली. बेल्हा- जेजुरी हा राज्य महामार्ग चालू झाला असून, या मार्गावर नाशिक, अहमदनगर, गुजरात उत्तर प्रदेश ह्या भागात जाणार्या वाहनांची वर्दळ वाढली असून, रहदारी वाढली आहे. शिक्रापूर रांजणगाव सणसवाडी, पुणे या औद्योगिक वसाहतीतील कामगारांना जाण्यासाठी बस सेवेचा फायदा होत आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, विविध कामासाठी पुण्याला जाणारे प्रवासी,बस सेवा बंद केली तर या भागातील जनतेची गैरसोय होईल. लोणी- पुणे बस सेवा बंद करू नये अशी मागणी सेवा निवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश वाळुंज पाटील, सुनील सुक्रे , व्यापारी असोसिएशन, महाविद्यालयीन विद्यार्थी करत आहेत.
No comments:
Post a Comment