मंचर, इंदापूर रूग्णालयात सीटी स्कॅन सेवा मिळणार- सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली मान्यता..
आंबेगाव (पुणे )तालुका( प्रतिनिधी- कैलास गायकवाड):-राज्यातील सरकारी निवडक ३२ रुग्णालयांमध्ये सी टी स्कॅन सेवा व २३ रुग्णालयात एम. आर. आय. बाह्य सेवा पुरवठादारा मार्फत उपलब्ध करून देण्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान योजने अंतर्गत राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.त्यानुसार जिल्हा रुग्णालय औंध (पुणे )येथे एम. आर. आय आणि सीटी स्कॅन सेवा उपजिल्हा रुग्णालय मंचर (आंबेगाव ) व इंदापूर येथे सीटी स्कॅन सेवा सुरू होणार आहे ५० टक्के सवलतीत रुग्णांना सेवा मिळणार आहे.
निविदा प्रक्रिया ची कारवाई सुरू आहे. सदर सेवा उपलब्ध होण्यासाठी रूग्णालयात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात येणारा बाह्य सेवा पुरवठादार रुग्णांना ठरवून दिलेल्या अल्पदरात सेवा देणार आहे. खाजगी हॉस्पिटल मधील रुग्णांना ही सेवा मिळणार नाही.
" मंचर उपजिल्हा रुग्णालयात दररोज सीटी स्कॅन सेवा उपलब्ध व्हावी मागणे रुग्ण कल्याण समितीच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली होती. सिटीस्कॅन मशिन ठेवण्यासाठी आवश्यक तेवढी जागा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा उपयोग पुणे व नगर जिल्ह्यातील बऱ्याच रुग्णांना होणार आहे "डॉ. अंबादास देवमाने
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मंचर ता. तालुका आंबेगाव जिल्हा पुणे.
No comments:
Post a Comment