बारामती तालुका पोलीसांनी घरफोडी करणारे चोर, मोटरसायकल चोरी करणारे चोर, पकडल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप व शेतीची अवजारे चोरी बाबत एकूण 14 गुन्हे उघड करीत चोरट्यांची टोळी केली गजाआड* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 1, 2022

बारामती तालुका पोलीसांनी घरफोडी करणारे चोर, मोटरसायकल चोरी करणारे चोर, पकडल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप व शेतीची अवजारे चोरी बाबत एकूण 14 गुन्हे उघड करीत चोरट्यांची टोळी केली गजाआड*

*बारामती तालुका  पोलीसांनी घरफोडी करणारे चोर, मोटरसायकल चोरी करणारे चोर, पकडल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप व शेतीची अवजारे चोरी बाबत एकूण 14 गुन्हे उघड करीत चोरट्यांची टोळी केली गजाआड*
 बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खेडेगावांमध्ये बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारी अवजारे चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. मोटारसायकल चोरी करणारे चोर, घरफोड्या करणारे चोर, पकडल्यानंतर सदर बाबतीत गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक श्री महेश  ढवाण यांनी सदर चोरटे पकडने बाबत मोहीम हाती घेतली.
तपास पथकातील पोलीस अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक रणजीत मुळीक , अमोल नरुटे पो.कॉ. प्रशांत राऊत यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना देऊन सदर चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्यास त्यांनी सांगितले. यावरून तपास पथकाने सदर टोळीचा अहोरात्र शोध घेण्यास सुरुवात केली.
अखेर पोलीस पथकास या चोरट्यांना पकडण्यात यश आले व दिनांक 26/5/2022 रोजी इसम नामे 1. अक्षय बाळासो हुले वय 26 वर्ष 
2. अक्षय लक्ष्मण घोलप  वय- 19वर्ष
3. अभिषेक दत्तात्रय गावडे  वय- 19 वर्ष
सर्व रा. मेडद तालुका बारामती जिल्हा पुणे
4. संतोष जगन्नाथ खांडेकर वय- 37 वर्ष रा. जळगाव क .प . तालुका बारामती जिल्हा पुणे . यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले . व चौकशीनंतर गु. रजि. नं.310/22 भादवि कलम 379 विहिरीवरील पाणी उपसण्याचे इंजिन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली . सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना  तपासादरम्यान आरोपी यांच्याकडे 2 इंजिन व 11 पाण्यातील मोटार व एक शेतीच्या मशागतीसाठी वापरण्यात येणारा कल्टीवेटर  मिळून आले आहे. सदरच्या चोर्‍या या करावागज, मेडद, माळेगाव ,गोजुबावी, सोनगाव, पारवडी या भागांमधून करण्यात आलेल्या आहेत तसेच सदर वस्तूंची वाहतूक करण्यासाठी आरोपी अभिषेक गावडे यांच्या मालकीचा छोटा टेम्पो ते वापरत असल्याचे निदर्शनात आले आहे. बऱ्याच दिवसापासून  ही टोळी सक्रिय होती शेतीमधील पाण्याचे पंप व शेती कामासाठी लागणारे अवजारे चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. हे चोरटे पकडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या या कारवाईमुळे शेती अवजारे व पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे इंजिन व मोटार यांची चोरी थांबणार आहे.

*सदर आरोपी यांच्यावरती बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे 11 मोटार ,2 इंजिन व एक शेतीची मशागत करण्यासाठी वापरात येणारे कल्टीवेटर असे एकूण चोरीचे तब्बल 14 गुन्हे  दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल व चोरी केलेला मुद्देमाल वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या टेम्पो हा आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. त्याची एकूण रक्कम 7,07,000 इतकी आहे*
     सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक  श्रीअभिनव जी देशमुख  पुणे ग्रामीण .अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद जी मोहिते  बारामती विभाग पुणे ग्रामीण .उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे  बारामती विभाग. पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण  बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक अमोल नरूटे, रणजीत मुळीक , पोलीस नाईक गावडे पो. कॉ. प्रशांत राऊत  यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment