लाच घेताना महिला सहायक पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात तीही महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेतली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 30, 2022

लाच घेताना महिला सहायक पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात तीही महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेतली..

लाच घेताना महिला सहायक पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात तीही महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेतली..
 पुणे : काय चाललंय हे सांगू शकत नाही पण लाच घेणाऱ्या पुरुषाप्रमाणे महिला देखील कमी नाही हे दाखविण्याचे काम सद्या दिसत आहे की काय हे नुकताच घडलेल्या प्रकारामुळे दिसत आहे हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी महिला डॉक्टर कडून 2 लाखाची लाच घेताना महिला सहायक पोलीस निरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात पकडले. नलिनी शंकर शिंदे  असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीने ही
कारवाई निगडी येथे गुरुवारी (दि. 30) केली.याप्रकरणी 62 वर्षाच्या महिला डॉक्टर यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांचे निगडी येथे हॉस्पिटल आहे. तर नलिनी शिंदे या सिंधुदुर्ग
पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला
अत्याचार निवारण कक्षात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात
 बाल लैंगिक प्रतिबंधक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा  दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास  नलिनी शिंदे यांच्याकडे आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्या निगडी  येथे आल्या होत्या. शिंदे यांनी तक्रारदार महिला डॉक्टर यांना हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न
करण्यासाठी आणि गुन्ह्याच्या तपासात
सहकार्य करण्यासाठी पाच लाखाची लाच
मागितली. तडजोडीमध्ये 2 लाख रुपये देण्याचे
ठरले होते. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे
मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे  तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांनी पाच लाख रुपये लाच मागून दोन लाख रुपये
लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार तक्रारदार यांच्या निगडी येथील हॉस्पिटलमध्ये आज सापळा रचण्यात आला.तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपये लाच
स्विकारताना नलिनी शिंदे यांना रंगेहाथ पकडले.
नलिनी शिंदे यांच्याविरुद्ध निगडी पोलीस
ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे
परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी,असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
1064 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क
साधावा.

No comments:

Post a Comment