बारामतीच्या मोफत आरोग्य शिबीरात 300 रुग्णांची तपासणी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 12, 2022

बारामतीच्या मोफत आरोग्य शिबीरात 300 रुग्णांची तपासणी*

*बारामतीच्या मोफत आरोग्य शिबीरात 300 रुग्णांची तपासणी*
    
     बारामती - (प्रतिनिधी) संत निरंकारी मिशन बारामती शाखेच्या वतीने शनिवारी (ता.११) आयोजित केलेल्या सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबीरात तिनशे रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
    सदर शिबीराचे आयोजन खंडोबा नगर येथील सत्संग भवनात सकाळी ९ ते ४ यावेळेत करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन  डॉ. पुरूषोत्तम अरोरा (प्रसिद्ध ह्रदय विकार तज्ञ, बेंगलोर) यांच्या हस्ते कर करण्यात आले.
    या शिबिरासाठी डॉ. पुरूषोत्तम अरोरा (प्रसिध्द हृदय विकार तज्ञ बंगरुळ, कर्नाटक), डॉ.विजयकुमार तावरे (मुंबई), डॉ. अंकिता केणी (जे जे रुग्णालय मुंबई), डॉ. तुकाराम खोत (गारगुटी कोल्हापूर), इत्यादि अनुभवी डॉक्टरांची टीम उपस्थित होती.
    हे शिबीर सर्वांसाठी मोफत असल्याने बारामती सह परिसरातील तीनशे गरजू रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये हृदय विकारासह इतर आजारांची मोफत तपासणी करून त्यावर मोफत औषधे देण्यात आली.
   सदर शिबीर यशस्वी पणे पार पाडण्यासाठी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक, संचालक शशिकांत सकट, सेवादल शिक्षक बाळासाहेब जानकर, महिला सहाय्यक शिक्षिका वर्षा चव्हाण यांच्यासह सेवादल, सेवादल भगिनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment