सहकाररत्न चंदुकाका यांच्या कार्याचा गौरव आज भारतीय डाक विभागातर्फे या स्मारकाच्या प्रतिमेवर तब्बल 70 MY STAMP च्या sheet (माझे टिकिट) वितरीत... सासवड:- सहकाररत्न चंदुकाका जगताप यांच्या ७४ व्या जयंती निमित्ताने दिनांक ११.०६.२०२२ रोजी सासवड या पुण्यनगरीमध्ये, त्यांच्या स्मरणार्थ उभरण्यात आलेल्या सुंदर स्मारकाचे उद्घाटन झाले. अवघ आयुष्य सहकार क्षेत्रात खर्ची टाकणारे सहकाररत्न चंदुकाका यांच्या कार्याचा गौरव आज भारतीय डाक विभागातर्फे या स्मारकाच्या प्रतिमेवर तब्बल 70 MY STAMP च्या sheet (माझे टिकिट) वितरीत करून करण्यात आला. सदरील MY STAMPs उपस्थित सरदार कुलतार सिंग संधवान , विधानसभा अध्यक्ष, पंजाब राज्य, मा. ना. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.सौ. सुप्रियाताई सुळे, खासदार बारामती लोकसभा, मा. श्री. दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.श्री. संजयजी जगताप, आमदार पुरंदर व इतर मान्यवरांना मा.श्री. दिलीप विठ्ठल सर्जेराव, अधिक्षक डाकघर, बारामती आणि मा. श्री. मारुती सुभाष मेढे, इंस्पेक्टर ऑफ पोस्ट, सासवड उपविभाग यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
आदरणीय काकांच्या या कार्याची हीच परंपरा पुढे घेऊन येत या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगताप कुटुंबियांनी मुलगी शिकावी आणि समृद्ध व्हावी म्हणून भारतीय डाक विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेअन्तर्गत तब्बल 1000 मुलींचे प्रत्येकी 250 रूपयांनी खाते उघडून देण्याचा मानस करत त्यांचे जीवन समृद्ध करण्यास हातभार लावला. या सुंदर उपक्रमाचे भारतीय डाक विभागातर्फे अभिनंदन करण्यात आले. तसेच मा.श्री. दिलीप सर्जेराव, अधिक्षक डाकघर, बारामती यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरवही करण्यात आला.
वरील कार्यक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास जाण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय , पुणे क्षेत्र,मा.श्री. बाळासाहेब एरंडे, अधिक्षक डाकघर, पुणे ग्रामीण, मा. श्री. सुखदेव मोरे, सहाय्यक अधिक्षक डाकघर, पुणे ग्रामीण, मा. श्री. गणेश सदाफुले, पोस्टमास्टर शिवाजीनगर, श्रीमती सविता वाघ, पोस्टमास्टर सासवड, श्री. रामदास भिसे, ब्रांच पोस्टमास्टर, पानवडी, श्री सुभाष काळे, श्री प्रवीण जगताप आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment