नवीन खाते उघडण्याच्या मोहिमेत पुणे ग्रामीण विभागास प्रथम पारितोषिक. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 1, 2022

नवीन खाते उघडण्याच्या मोहिमेत पुणे ग्रामीण विभागास प्रथम पारितोषिक.

नवीन खाते उघडण्याच्या मोहिमेत पुणे ग्रामीण विभागास प्रथम पारितोषिक.
पुणे:- पुणे ग्रामीण विभागाला आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये सर्वाधिक खाते
उघडण्यासाठी पारितोषिक मिळाले. पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बी पी एरंडे
यांनी हा पुरस्कार श्रीमती विना रामकृष्ण श्रीनिवास मुख्य पोस्टमास्तर जनरल
महाराष्ट्र व गोवा सर्कल यांच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गोवा
राज्यातील सर्व पोस्टमास्तर जनरल, निर्देशक व सर्व विभागीय प्रमुख उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशदा पुणे येथे दि ३१.०५.२०२२ रोजी संपन्न झाला.पुणे ग्रामीण विभागामध्ये श्री बी पी एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आर्थिक
वर्षात खाते उघडण्यासाठी विविध उपक्रम संपन्न झाले व विभागात सर्व प्रकारची मिळून दीड लाखापेक्षा जास्त खाती उघडली गेली. पुणे ग्रामीण विभाग पुणे रिजन मध्ये प्रथम क्रमांकावर आला. दि ०१.०५.२०२२ पासून पुणे ग्रामीण विभागामध्ये मिशन एक लाख अभियानाची सुरुवात झाली असून जनतेकडून सदर
अभियानाकरिता उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पोस्टाच्या बचत खात्यामधून इतर बँकामध्ये NEFT मार्फत पैसे पाठवणे आता शक्य झाले आहे तसेच चालू आर्थिक वर्षात सुद्धा विभागामध्ये खाते उघडण्यासाठी विविध उपक्रम चालू असून जवळच्या पोस्टात आपले बचत खाते उघडून घ्यावे असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बी पी एरंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment