बापरे.. काय चाललंय बारामतीत, मुली सुरक्षित नाहीत.. फोटो, व्हिडिओ काढत अल्पवयीन मुलीवर बलात्कार.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 12, 2022

बापरे.. काय चाललंय बारामतीत, मुली सुरक्षित नाहीत.. फोटो, व्हिडिओ काढत अल्पवयीन मुलीवर बलात्कार.!

बापरे.. काय चाललंय बारामतीत, मुली सुरक्षित नाहीत.. फोटो, व्हिडिओ काढत अल्पवयीन मुलीवर बलात्कार.!                                             बारामती:-काय चाललंय बारामतीत मुली, महिला सुरक्षित नसल्याची सतत बातम्या प्रसिद्ध होत आहे शहर व तालुक्यात महिला अत्याचाराच्या घडत आहे, इथे मुली, महिला सुरक्षित नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले, मोरगाव (ता. बारामती)येथील अल्पवयीन मुलीला शाळेतून जेजुरीतील लॉजवर नेत तिचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढत
तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी प्रदीप बाळासो शिंदे (रा.तरडोली, ता. बारामती) या आरोपीला अटक केली.पीडीत मुलीच्या कुटुंबियानी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी शिंदे याच्या विरोधात अपहरण,
बलात्कार तसेच बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ११ जून ला ही घटना घडली.
शिंदे याने ही मुलगी मोरगावातील विद्यालयात गेली असताना तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जेजुरी येथील एका लॉजवर नेले. तेथे तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर तिच्याशी बळजबरीन
शारिरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास फोटो व व्हिडिओ सर्वांना पाठवीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment