पुणे ग्रामीण विभागातील डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 16, 2022

पुणे ग्रामीण विभागातील डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार..

पुणे ग्रामीण विभागातील डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार..
 पुणे:- पुणे ग्रामीण विभागात चालू आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचा
सत्कार पुणे क्षेत्रीय कार्यालयाच्या निर्देशिका सुश्री सिमरन कौर व पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बी पी एरंडे यांच्या हस्ते दि १६.०६.२०२२ रोजी शिवाजीनगर येथे पार पडला. पुणे ग्रामीण विभाग नवीन खातेवृद्धीमध्ये महाराष्ट्र सर्कल मध्ये चालू वर्षात प्रथम क्रमांकावर आहे. मे महिन्यात पार पडलेल्या मिशन एक लाख नवीन खाते यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या डाकपाल, उपडाकपाल,शाखाडाकपाल व पोस्ट ऑफिस अल्पबचत एजंट यांचा सत्कार यानिमित्ताने करण्यात आला मिशन एक लाख नवीन खात्यामध्ये डाकपाल बारामती श्री लालासाहेब जाधव यांनी एका दिवसात ६२१ नवीन खाती उघडून विभागामध्ये एका दिवसात सर्वात जास्त खाती काढण्याचा विक्रम केला. त्यांना
विभागातर्फे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपडाकपाल भोर श्री शिवराज तेलंगे,उपडाकपाल सासवड श्रीमती सविता वाघ व उपडाकपाल मंचर श्री महेश शेलार यांचा अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. भोरमधील अल्पबचत एजंट श्रीमती सुषमा आलाटे यांनी ५०२ खाती उघडून पुणे ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक पटकावला. श्रीमती लीना कामठे मंचर व पुष्पलता दळवी लोणावळा यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. शाखाडाकपाल श्री
ज्ञानेश्वर गोसावी सादळगाव बी ओ, श्री विकास शेडगे भोंगवली बी ओ व संजय टिळेकर कलठन बी ओ यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात एकूण १० कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला गेला
या कार्यक्रमास सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये मुख्यालय सहाय्यक अधीक्षक श्री एस डी मोरे, पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री दत्तात्रय वन्हऱ्हाडी व श्री दत्तात्रय खेडेकर, जुन्नर
उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक श्री एस बी भंडारी व पश्चिम उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक श्री गणेश वडूरकर व डाकनिरीक्षक श्री राहुल शित्रे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment