धक्कादायक..५० हजार हप्ता द्या ?नाहीतर जनावरांचा बाजार करू देणार नाही म्हणत टेभुणींत कुरेशीच्या तरुणांवर जीवघेणा हल्ला, गोरक्षकांवर गुन्हा दाखल.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 3, 2022

धक्कादायक..५० हजार हप्ता द्या ?नाहीतर जनावरांचा बाजार करू देणार नाही म्हणत टेभुणींत कुरेशीच्या तरुणांवर जीवघेणा हल्ला, गोरक्षकांवर गुन्हा दाखल.!

 धक्कादायक..५० हजार हप्ता द्या ?नाहीतर   जनावरांचा बाजार करू देणार नाही म्हणत टेभुणींत कुरेशीच्या तरुणांवर जीवघेणा हल्ला, गोरक्षकांवर गुन्हा दाखल.!                                                                         टेभुणीं(प्रतिनिधी):-दि.३०/५/२०२२ रोजी फिर्यादी  शाहबाज शफीक कुरेशी वय २५ वर्षे धंदा ड्रायव्हर स.पापनस ता. माढा जि. सोलापूर यांनी टेभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब दिला की, मी माझी पत्नी आलिया, आई तसेच दोन मोठे भाऊ त्यांच्या बायका मुलासह एकत्रित राहतो. माझी पिकअप वाहन असून ते मी चालवितो व मोठे दोन भाऊसुद्धा वाहनाचा व जनावरांचा व्यापार करतात त्यावरती आमचा उदरनिर्वाह चालतो. दिनांक ३०/५/२०२२ रोजी पहाटे २/३० वा. सुमारास मी व माझे चुलत असिफ खलील जावेद सलीम कुरेशी असे आम्हास वाहनास भाडे असल्याने आम्ही तिघेजण अकलूज ता.माळशीरस येथे आठवडा बाजार असल्याने जनावरे व शेळ्या खरेदी करण्यासाठी अकलूज ता. माळशीरस येथे निघालो असताना आमचे अलीकडे जिल्हा दूध संघासमोर आमचे पाठीमागून अचानक एक तवेरा गाडी नंबर एम. एच. १२. एच.एल ६७७८ व मोटार सायकल नंबर एम. एच. २५.ए.ई.६१९७ या वाहनांवरील स्वारांनी आमच्या पिकअप वाहनास त्यांच्या माझे पिकअप रोडवर आले असता ओव्हरटेक करून
तवेरा वाहनातून आमच्या कुटुबांचा कुरेशी व आमचा नातेवाईक जनावरांचा व शेळयाचा
पिकअप टेंभूर्णी गावच्या आमच्या पिकअप वाहनास आडवी मारून थांबवून आमचे पिकअप वाहन आडविले. त्यानंतर सदर सुधाकर बहिरवाडे व त्याच्यासोबतचे तीन इसम व बुलेट वरील संतोश जगदाळे रा. माढा व त्याचे सोबतचा एक अनोळखी इसम असे एकूण ६ लोक आमचे पिकअप वाहनाजवळ आले व त्यांनी मला व माझे सोबतचे असिफ कुरेशी व जावेद कुरेशी असे आम्हाला त्यांनी शिवीगाळी करून धक्काबुक्की करून पिकअप वाहनातून खाली उतरविले. त्यानंतर सुधाकर बहिरवाडे यांनी आम्हां तिघांना तुम्हांला यापूर्वी आम्ही जनावरे
व शेळ्या खरेदी विक्री करू नका, तुम्हांला जर तो व्यवसाय करायचा असेल तर आम्हांला महिन्याला ५०,०००/- रूपये हप्ता दयावा लागेल असे सांगितले होते. असे म्हणून पैसे मागितले. त्यावेळी माझे सोबतचे असिफ कुरेशी यांनी त्यांना तुम्हांला कसले पैसे, हप्ता दयायचा असे म्हणाले असता त्या सर्वांनी मिळून आम्हां तिघांना शिवीगाळी, दमदाटी केली व सुधाकर बहिरवाडे यांनी त्याचे हातातील लोखंडी गजाने आसिफ कुरेशी याचे डावे खांदया खाली, पाठीवर व डोकीत मारून गंभीर जखमी केले आहे. त्याचवेळी संतोश जगदाळे याने त्याच्या हातातील काठीने माझे सोबतचे जावेद सलीम कुरेशी
मारहाण करून.निघून गेले. त्यानंतर
डोक्यातुन रक्त आले आहे.याचे पाठीवर मारून जखमी करून त्यानंतर आम्हाला मारहाण करून निघून वाहनासह तेथुन केले आहे व बाकीचे चार अनोळखी इसमांनी आम्हां तिघांनाही शिवीगाळी दमदाटी करणारे वरील सहा इसम आम्हाला मारहाण केलेल्या हत्यारासह व त्यांचे वरील आम्ही तिघेजण आमचे पिकअप वाहनासह टेंभुर्णी पेालीस ठाणे येथे आलो. माझे सोबतचा जखमी झाल्याने रक्त येत असल्याने त्यास आम्ही दोघांनी यशश्री हॉस्पिटल टेंभुर्णी, येथे घेवून जावुन उपचारास दाखल केले. त्यानंतर मी फिर्याद देण्याकरीता निघालो.सोबतचे वरील जखमी असिफ कुरेशी याचे व कुरेशी व जावेद कुरेशी असे आमचे वरील पिकअप वाहनातुन अकलुज येथील आठवडा बाजारात शेळया
तरी आज दि. ३०/०५/२०२२ रोजी पहाटे ४ वा. चे सुमारास मी व माझे असता टेंभुर्णी गावचे शीवारातील जिल्हा दूध संघासमोर रोडवर आमचे पिकअप वाहन आले असता वरील 1) सुधाकर बहिरवाडे रा. सोलापुर 2)संतोश जगदाळे रा. माढा व त्यांच्या सोबतचे अनोळखी चार इसम यांनी त्याचे कडील वरील तवेरा गाडी व बुलेट गाडी यावरती येवुन आमचे पिकअप वाहनास आडवुन आम्हांला त्यांनी जनावरांचा व्यापार करावयाचा नाही, करावयाचा असल्यास आम्हाला महिन्याला ५०,०००/- रूपये हप्ता दयावा लागेल असे म्हणुन पैशाची मागणी करून आम्हांला पैसे देण्यास नकार दिल्याने शिवीगाळी, दमदाटी करून लाथाबुक्याने मारहाण करून
व हातातील काठीने व लोखंडी गजाने जखमी केले आसिफ कुरेशी व जावेद कुरेशी यांना मारून गंभीर जखमी केले. म्हणून माझी वरील १ ते ६
लोकांविरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली यानुसंगाणे 1)सुधाकर बहिरवाडे, सोलापुर, सोलापूर, सोलापुर ग्रामीण,महाराष्ट्र, भारत
2)संतोश जगदाळे. माढा,ता. माढा, सोलापुर ग्रामीण, महाराष्ट्र, 3) तसेच अनोळखी चार इसम,पत्ता माहिती नाही, टेंभुर्णी, सोलापुर
ग्रामीण, महाराष्ट्र  यांच्या विरोधात कलम ३२६
भारतीय दंड संहिता १८६०,भारतीय दंड संहिता १८६०,भारतीय दंड संहिता १८६०,३८५,३२४ भारतीय दंड संहिता १८६०,३२३,भारतीय दंड संहिता १८६०,३४१ भारतीय दंड संहिता १८६०,१४७,१४८,भारतीय दंड संहिता १८६०
भारतीय दंड संहिता १८६०,भारतीय दंड संहिता १८६०,१४९,५०४ भारतीय दंड संहिता १८६०,५०६ नुसार दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहे,तर ज्या वाहनातून येऊन गाड्या अडविले त्या जप्त वाहण्याच्या मालकावर गुन्हा दाखल होणार का? ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला हवा होता तो का झाला नाही?अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आले,तर दुसरीकडे  जखमी इसमाची परिस्थिती बिकट असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे,सध्या तथाकथित गोरक्षकांचा धुमाकूळ चालू असून महाराष्ट्रात विनाकारण जनावरांच्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार चालू आहे, अश्या अनेक घटना घडल्या व घडत आहे की त्यामध्ये गोरक्षकांचा व जनावरे विक्री करणार्यांचा संघर्ष पहावयास मिळत आहे यामध्ये कित्येक वेळा जीवावर देखील बेतले आहे तर काहीजण जखमी झाले आहे, कत्तलीसाठीच जनावरे चालवली आहे म्हणून भर रस्त्यात गाड्या अडवून लूटमार व मारहाण होत असल्याचे कळतंय, जर खरंच गायाची कत्तली होत असेल तर खातरजमा करून जरूर कारवाई करावी परंतु कायदेशीर मार्गाने असेही भावना व्यक्त होताना दिसते. गोरक्षणाच्या नावाखाली जनावरे पकडून त्यांना गो शाळेत नेले जाते तर असे २५ ते २५ हजार जनावरे आत्तापर्यंत जप्त केली असेल ती पंजरपोळ्यात,गोशाळेत व्यवस्थित आहेत का ? त्याची देखभाल होतेय का?का कुठे दुसरीकडे विकली गेली असे अनेक प्रश्न विचारले जात आहे? खरे गोरक्षक कोण व तथाकथित गोरक्षक कोण हे समजले नसल्याचे कळते.अश्या गोरक्षकावर अनेक गुन्हे दाखल असताना तसेच काहीजण तडीपार असताना देखील कित्येक ठिकाणी जनावरांच्या गाड्या अडवून मारहाण, शिवीगाळ व लूटमार करण्याचा प्रकार होत असल्याचे सांगण्यात आले याबाबत लवकरच महाराष्ट्रातून कुरेशी बांधव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री सह अनेक खात्याच्या मंत्री महोदयांना व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन न्याय द्यावा आम्हाला सुरक्षा द्यावी व गुंड गिरी करणाऱ्या तथाकथित गोरक्षक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे समजले.

No comments:

Post a Comment