*संत निरंकारी मिशनच्या वतीने मानवतेला समर्पित**आंतरराष्ट्रीय योग दिवस* - vadgrasta

Post Top Ad

Monday, June 20, 2022

*संत निरंकारी मिशनच्या वतीने मानवतेला समर्पित**आंतरराष्ट्रीय योग दिवस*

*संत निरंकारी मिशनच्या वतीने मानवतेला समर्पित**आंतरराष्ट्रीय योग दिवस*

      बारामती (प्रतिनिधी) - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने यावर्षी संत निरंकारी मिशन बारामती शाखेच्या वतीने मंगळवारी (ता. २१) ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा नगर येथील सत्संग भवनातील पटांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती येथील शाखेने दिली. ज्याचा प्रारंभ सकाळी ६.०० वाजता होईल.
    मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सन २०१५ पासूनच योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात करण्यात आले आहे.
  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अनेकदा आपल्या विचारांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच आपल्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याची प्रेरणा देत असतात. या योग दिवसाचा उद्देशही हाच आहे, की सर्वांमध्ये एकाग्रता आणि सामुदायिक सामंजस्याच्या भावनेचा संचार व्हावा, ज्यायोगे हे जीवन आणखी सुंदर व उत्तम रीतीने जगता येईल. वर्तमान समयाला तनावपूर्ण व नकारात्मक विचारांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडत आहे. अशा वेळी ईश्वराने जे हे मनुष्य तन आपल्याला दिलेले आहे त्याचा सांभाळ योगाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानेंद्रियांना जागृत करुन आध्यात्मिकतेने युक्त जीवन जगता येऊ शकते.
योग ही प्राचीन भारतीय परंपरेची अमूल्य देणगी आहे. मन आणि शरीर यांच्या एकतेचे ते प्रतीक आहे. योग हा केवळ व्यायाम नाही तर तो सकारात्मक भावना जागृत करुन तनावमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देतो. योगाद्वारे आपली जीवनशैली सहज व सक्रिय करुन स्वस्थ जीवन जगता येते. वर्तमान काळात तनावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाची नितांत गरज आहे. आज ही संस्कृती संपूर्ण विश्वातील जवळपास सर्व देशांकडून अंगीकारली जात आहे.

No comments:

Post a Comment