*जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची नियंत्रण कक्षास भेट*
पुणे :- आषाढी पालखी सोहळ्यातील सेवेसाठी तातडीने संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी भेट देवून बिनतारी यंत्रणेची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते.
डॉ.देशमुख यांनी नियंत्रण कक्षातून पालखी तळ सासवड आणि सासवड तहसील कार्यालय येथील कक्षाशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी २५, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी २५, जिल्हा नियंत्रण कक्ष, तहसील कार्यालय, सासवड, पालखी तळ सासवड, जेजूरी मंदीर व वाल्हे येथे बेसस्टेशन देण्यात आले आहे. दिवेघाट, भुलेश्वर व जेजुरी येथे रिपीटर बसविण्यात आले आहे तर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हवेली, तहसीलदार पुरंदर, तहसीलदार बारामती व तहसीलदार दौंड यांना गाडीमध्ये मोबाईल व्हॅन सेट देण्यात आले आहेत. यामुळे आवश्यक नियोजनासाठी संवाद सुलभ होणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे व खाजगी कंपनीचे व्यवस्थापक नितीन आयनापुरे यांनी आषाढी पालखी सोहळ्यासाठी असलेल्या बिनतारी यंत्रणेबाबत माहिती दिली.
No comments:
Post a Comment