"तू माझ्याशी संबंध तोडले तर मी तुझ्यावर व तुझ्या घरच्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करील"असे म्हणणाऱ्या तरुणीच्या धमकीला भिऊन तरुणाने केली आत्महत्या ! बारामती:- तरुणीकडून बलात्काराचा
गुन्हा दाखल करण्याची धमकी आल्याने, विवाहित तरुणाने आत्महत्या केली,लग्नानंतरही एका तरुणीबरोबर अनैतिक संबंध ठेवले. घरातील विरोधानंतर त्याने तिच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने
संबंध तोडले तर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन सर्वांना जेलमध्ये टाकीन, अशी धमकी दिली. या धमकीमुळे एका विवाहित तरुणाने घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
बारामती येथील अमीर शकूर काझी वय 30, रा. कसबा, बारामती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात एका तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमीर काझी याच्या पत्नीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर काझी याला दोन मुली असून तो दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता.
त्याचे एक वर्षांपासून एका तरुणीबरोबर
अनैतिक संबंध होते.अमीर हा तिच्या घरी जात होता. याला त्याच्या घरातून विरोध होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला वेगळे रहायला सांगितले होते.गेल्या काही दिवसांपासून तो तिच्याशी संबंध
तोडण्याचा प्रयत्न करीत होता.त्यामुळे तो तणावात होता.पत्नीने त्याला विचारले असता "तू माझ्याशी संबंध तोडले तर मी तुझ्यावर व तुझ्या
घरच्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे बलात्काराची
तक्रार दाखल करील व तुला व तुझ्या घरच्यांना
जेलमध्ये टाकीन.तुमच्या घरच्यांच्या सर्वांच्या नावची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल,” अशी वारंवार धमकी देत असल्याचे त्याने पत्नीला सांगितले.त्यामुळे तिने मला फोन करुन बोलाविल्यानंतर मला जावे लागते, असे त्याने सांगितले.19 मे रोजी अमीर मोबाईलवर मोठमोठ्याने बोलत घरी आला.त्याने खोलीला आतून कडी लावून घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंत्यविधी पार पडल्यानंतर आता पोलिसाकडे
फिर्याद दिली असून पोलिसांनी त्या
तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment