शैक्षणिक कार्य करण्याचे अद्वैतीय योगदान करणारे स्व.हनुमंतराव सावंत सर... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

शैक्षणिक कार्य करण्याचे अद्वैतीय योगदान करणारे स्व.हनुमंतराव सावंत सर...

शैक्षणिक कार्य करण्याचे अद्वैतीय योगदान करणारे स्व.हनुमंतराव सावंत सर...             बारामती:- आधुनिक काळात शिक्षण घेण्यासाठी येणारे सगळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जाते का ते पाहण्यासाठी उपाय योजना करणे वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेला निर्णयाची अंमलबजावणी समाजाभिमुख कशी होईल यासाठी सोमेश्वरनगर येथील वाघळवाडी परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात माळरानात डोंगराच्या कुशीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी या भागात हाडाचे शिक्षक म्हणून कै. हनुमंतराव सावंत सर
यांनी प्रचंड मेहनत घेवून 1985 मध्ये ग्रामविकास संघटनेच्या माध्यमातून उत्कर्ष प्राथमिक शाळा ; उत्कर्ष माध्यमिक आश्रम शाळा
व ज्यु. कॉलेज, उत्कर्ष बालसदन वाघुळवाडी इ. शैक्षणिक संस्थांची स्थापना कै. सावंत सर यांनी केली. या माळरानाचे सरांच्या कुशल कर्माने शैक्षणिक नंदनवन झाले. कै. हनुमंतराव सावंत सर यांच्या बरोबर माझा संवाद पुणे विद्यापीठात झाला होता. कै. हनुमंतराव सावंत सर यांनी शैक्षणिक संस्थांचे विस्तार करण्यासाठी अहोरात्र
कष्ट घेतले. आज संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. सरांच्या दुरदृष्टीचा आज संस्था पाहिली की प्रत्यय येतो.आज कै. हनुमंतराव सावंत सर यांच्या 10 वा पुण्यस्मरण दिन आहे. सरांच्या सहवासात 10, 12मिनिटे राहण्याचा
, बोलण्याचा 2007; 2008 मध्ये मी पुणे विद्यापीठात योग होता. नंतर सहवास लाभला नाही त्याचे मला आज खुप दुःख होत आहे. आज शैक्षणिक संस्थांचे विस्तार करण्यासाठी सरांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रोहिणी सावंत मॅडम;चिरंजीव अजिंक्य सावंत; धनश्री गायकवाड-सावंत इ. अहोरात्र शैक्षणिक समुपदेशन करणारे दुत म्हणून नव्या पिढीला ते आदर्श समाज घडवून आणण्यासाठी खुप मदत करीत आहेत. वारसा जोपासत आहेत.कै. हनुमंतराव सावंत सर यांच्या प्रचंड मेहनतीने आज सोमेश्वरनगर वाघळवाडी परिसर समर्थ ज्ञानपीठ वटवृक्षाच्या सावलीत गुणवत्ता प्राप्त शिक्षण घेण्यासाठी गोरगरीब वंचित समाज घटकास माफक दरात राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येते. समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री पब्लिक स्कूल, (सी.बी.एस्
ई), सह्याद्री पब्लिक स्कूल (आय.एन.टी.सी.बी.एस.ई.); पुरंदर पब्लिक स्कूल (आय.एन.टी.सी.बी.एस.ई) जेजुरी; सहयाद्री कॉलेज आॅफ एज्युकेशन; सह्याद्री कॉलेज ऑफ डेअरी डिप्लोमा;समर्थ ज्ञानपीठ संचलित यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सेंटर वाघळवाडी; सोमेश्वरनगर इ.शैक्षणिक संस्थांचे कार्य मोठ्या जोमाने सुरू आहे. प्राथमिक शिक्षणाचे सर्वांगीण विकासाभिमुख शिक्षण
देण्यासाठी या भागात हाडाचे शिक्षण तज्ञ म्हणून कायम कै. हनुमंतराव सावंत सर माझ्या स्मरणात राहतील.शैक्षणिक विकासासाठी व मुल्याधिष्ठीत संवर्धन जोपासण्याचे पवित्र शैक्षणिक कार्य करण्याचे अद्वैतीय योगदान सावंत सर यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे विस्तारीकरण स्वप्नांचा प्रवास फलदायी व यशस्वी करण्यात अजिंक्य सावंत दादा यशस्वी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.कै. हनुमंतराव सावंत सर यांच्या 10व्या पुण्यस्मृती दिनी विनम्र भावनेने नतमस्तक होतो. सरांच्या शैक्षणिक कार्याचा वसा व वारसा येथून पुढे असाच अखंडितपणे चालू ठेवू या.
कै हनुमंतराव . सावंत सर यांच्या 10व्या पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली...
प्रा. गोरख साठे सर
(एम.ए. एम.एड) (इंग्लिश)
मो. 9833661268

No comments:

Post a Comment