*लोणारी समाज संघटने कडुन वारकर्यांना अल्पोपहार वाटप..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 28, 2022

*लोणारी समाज संघटने कडुन वारकर्यांना अल्पोपहार वाटप..!

*लोणारी समाज संघटने कडुन वारकर्यांना अल्पोपहार वाटप..!
बारामती:- शहरातील लोणारी समाज संघटनेच्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकरी भक्तांना अल्पोपहार , मास्क ,सॅनीटाजर वाटप करण्यात आले.चारशे ते पाचशे वारकरी भक्तांनी याचा लाभ घेतला..लोणारी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. अमोल कुलट यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.लोणारी समाजातील पन्नास हुन अधिक बांधव व महिला भगिनींनी सहभागी होऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उंडवडी ते बारामती स्वच्छता मोहीम हाती घेतली..पालखी मार्गावरील कचरा गोळा करण्यात आला..तसेच वारकरी भक्तांची चरणसेवा करण्यात आली. लोणारी समाज संघटनेचे हे ३ रे वर्ष आहे. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर श्री. संभाजी नाना होळकर श्री. सिद्धार्थ गिते , तानाजीराव कर्चे , यांनी उपस्थिती लावून वारकरी भक्तांचे स्वागत केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल कुलट, तात्या राणे, गणेश आटपडकर, कैलास कर्चे, धनेश कर्चे, ॲड. भालचंद्र होळकर, दत्तात्रय कर्चे, किरण कारंडे, प्रकाश कर्चे, अनिल होळकर, सौ. द्वारका ताई कारंडे, सौ. आशा ताई आटपडकर यांनी कार्यक्रमासाठी  परिश्रम घेतले..

No comments:

Post a Comment