आजच्या राजकारणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यापक विचारांचा आदर्श घेणे आवश्यक - कल्याणी वाघमोडे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 26, 2022

आजच्या राजकारणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यापक विचारांचा आदर्श घेणे आवश्यक - कल्याणी वाघमोडे

आजच्या राजकारणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यापक विचारांचा आदर्श घेणे आवश्यक - कल्याणी वाघमोडे 

बारामती: - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीमहोत्सव  निमित्ताने छत्रपती साखर कारखाना  भवानीनगर, (बारामती - इंदापूर रोड )या ठिकाणी अनेक कार्यक्रम उत्साहात पार पडले .दुपारी आदरणीय राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून सुरुवात करण्यात आली .जयंती उत्सवास शुभेच्छा देऊन ते पुढील राजकीय मीटिंग साठी रवाना झाले .संध्याकाळी माळशिरस च्या जय हनुमान च्या वतीने गझी ढोल नृत्य कार्यक्रम  ,शाहीर सागर माने यांच्या वतीने धनगरी ओवी कार्यक्रम ,सत्कार मूर्ती व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवर यांच्या  हस्ते सत्कार ,विधवा व  महिलांना  हळदी कुंकू कार्यक्रम आणि सन्मान,अन्नदान , अश्या  प्रकारे सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . अहिल्याक्रांती महिला विकास प्रतिष्ठान व क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे व  मित्र परिवार  यांच्या वतीने कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होत .शेकडो महिलांच्या उपस्थितीमधे व मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन  आणि प्रतिमापूजन करण्यात आले .

प्रास्ताविक कल्याणी वाघमोडे यांनी केले ,त्यावेळी त्या बोलत होत्या .
अठराव्या शतकातील अहिल्यादेवी होळकर या उत्तम प्रशासक  होऊन गेल्या .आजच्या राजकारणाला अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची गरज आहे .याचा आदर्श राजकीय व्यक्तींनी घ्यावा ,हि  अपेक्षा कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केली .२८ वर्ष राज्य कारभार करणाऱ्या,व्यापक विचारधारा असणाऱ्या ,अनेक समाजपयोगी निर्णय राबवत योग्य न्यायव्यवस्था चालवली . अश्या महान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ३१ मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी ,अशी मागणी करत सरकारकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे ,याची खंत व्यक्त केली .

अहिल्यादेवी होळकर  कार्यक्रमास उपस्थित राहीलेल्या सर्व सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक ,शैक्षणिक क्षेत्रातील बंधू भगिनी यांचे मनापासून आभार मानले . यावेळी बाल व्याख्याता मंगेश झंजे,मोनाली लिंगे ,प्रकाश देवकाते ,मा सरपंच पिंटू बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी नायब तहसीलदार भक्ती देवकाते ,पीएसआय प्राजक्ता घुले , मा.पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, फलटण नगरपालिकेच्या  मा.नगरसेवक वैशाली चोरमले ,सणसर ग्रामपंचायत च्या ज्योत्स्ना भोईटे , स्व.स्वप्नील लोणकर चे वडील सुनील लोणकर व कुटुंब ,
मा.सरपंच पप्पू अर्जुन , ढेकळवाडी सरपंच लक्ष्मी बोरकर ,उपसरपंच राहुल कोळेकर ,सदस्य सीमा झारगड,सदस्य  अर्चना देवकाते ,सदस्य सुनीता टकले ,सदस्य मंगल ठोंबरे ,सदस्य सीमा ठोंबरे , जांब च्या सरपंच रोहिणी रूपनवर ,सदस्य अश्विनी रूपनवर ,मंजुळाताई  रूपनवर,विजयाताई  पिंगळे , भाजपा युवा नेते अभिकाका देवकाते ,मुंबई महापौर केसरी पै .भारत मदने , सिने अभिनेत्री कल्पना भावसर व विजया गव्हाणे , निरावागज चे उपसरपंच सनी देवकाते , सदस्य संजय देशमुख ,मा.सरपंच शिवाजी लकडे, युवा नितीन जानकर ,संकेत देवकाते ,अमोल मदने ,निखिल पाटील  आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते .महाराष्ट्र मधे उल्लेखणीय कार्य करणाऱ्या ,इतर महिलांना प्रेरणा देणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचा मराठवाडा विभाग कडून मा.सरपंच बाळासाहेब जोशी ,मा सरपंच गजानन काळंगे ,सदस्य महेंद्र वाघमोडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला .
आभार सुजित वाघमोडे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन ज्ञानदेव बुरूंगले यांनी केले .

No comments:

Post a Comment