जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे प्रकल्प संचालक श्री विजय कान्हेकर यांना सन्मानपत्र =====================
पुणे:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्यातर्फे श्री विजय कान्हेकर यांना दिव्यांगासाठी शीघ्र निदान व उपचार, डे केअर सेंटर, मल्टी थेरपी सेंटर, सेंसरी गार्डन, इत्यादी सुविधा उभारून देशपातळीवरील प्रशिक्षण केंद्र तयार करणे, जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभाग, दिव्यांग लाभार्थी व संबंधित विभाग यांच्यातील एक दुवा म्हणून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली
या केंद्राद्वारे एकवीस प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण पुनर्वसनाच्या दृष्टीने जनजागृती सर्वेक्षण, जलद निदान सल्ला व मार्गदर्शन, कृत्रिम अवयव व साधने पुरवठा, शस्त्रक्रिया, दाखला देणे तसेच विशेष शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे कार्य पार पाडले जात आहे
सदर केंद्राची उभारणी व प्रभावी अंमलबजावणी करणे कामी आपण दिलेल्या अतिविशेष योगदानाबद्दल मा. आयुष प्रसाद (भा. प्र. से ) मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे व मा. सौरभ राव (भा. प्र. से ) विभागीय आयुक्त पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ` सन्मानपत्र ´ प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील दिव्यांग चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्त्याचा हा सन्मान केल्याबद्दल श्री विजय कान्हेकर सरांचे महाराष्ट्रातून कौतुक होत आहे अशी माहिती श्री रमेश मुसूडगे समन्वयक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment