हजरत मुहम्मद पैगंबर (स.) सर्वांसाठी अभियान २०२२ संकल्पना अंतर्गत बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन, बारामती आयोजित सामाजिक एकतेचा संदेश देणारा ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न...
बारामती:- शेख सुभानअली सर, अध्यक्ष दंगामुक्त भारत, सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश, शिवचरित्र व्याख्याते यांच्या संकल्पनेतून आणि मोलाच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या मोलाच्या उपस्थितीत हजरत मुहम्मद पैगंबर (स.) सर्वांसाठी अभियान २०२२ अंतर्गत बारामती तालुक्यातील मौजे लोणी भापकर गावात सामाजिक एकतेचा संदेश देणारा ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम गावातील बौद्ध समाज मंदिर येथे बौद्ध समाज बांधव,मातंग समाज मंदिर येथे मातंग समाज बांधव या आपल्या शोषित, वंचित बहुजन समाज बांधवांसोबत एकाच वेळी तिन्ही ठिकाणी आनंदाने तसेच एका अनोख्या पद्धतीने सस्नेह शिरखुर्मा पार्टी तसेच सर्व समावेशक ईद मिलन चा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.आपल्या देशात नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने ईद मिलन कार्यक्रम नेहमीच होत असतात परंतु या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य आणि उद्दिष्ठ फार आगळे वेगळे होते. बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन आयोजित ईद मिलन कार्यक्रमाची संकल्पना या वर्षीची ईद आपल्यातीलच बहुजन शोषन,पिडीत, वंचित, आदिवासी, दलित, बंजारा, कातकरी, धनगर, भटक्या जमाती, बौद्ध, मातंग समाजबांधव यांच्या सोबत ते ज्या ठिकाणी, ज्या गावात, ज्या वाड्यावस्त्यात राहतात त्या ठिकाणी जाऊन लहान मुले, मुली, माता, भगिनी यांच्या सोबत मा. शेख सुभानअली सर यांच्या उपस्थितीत
हजरत मुहम्मद पैगंबर सर्वांसाठी अभियान २०२२ या अभियानांतर्गत रमजान ईद साजरी करण्यात आली. सर्व समाज बांधवांना तसेच माता भगिनी, लहान मुले यांना भेटवस्तु म्हणुन नवीन कपडे भेट देवून त्यांच्यासोबत गोड शिरखुर्मा खाऊन संबंधित कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आणि प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर (स.) फक्त एका मुस्लिम धर्मासाठी नसुन सबंध अखिल मानवतेसाठी आहेत तसेच जगातील सर्व मानव सेवेसाठी आहेत हे मोलाचे मार्गदर्शन मा. शेख सुभानअली सर यांच्या उपस्थितीत
हा बंधुत्वाचा व प्रेमाचा संदेश पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हजरत मुहम्मद पैगंबर (स.) सर्वांसाठी अभियान २०२२ संकल्पनेचे जनक संयोजक
मा. शेख सुभानअली सर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन बारामती तालुक्यातील मौजे लोणी भापकर या गावातील ग्रामस्थ तसेच आपल्या हक्काच्या जिवाभावाच्या माणसांशी स्नेह, प्रेम, बंधुत्व निर्माण व्हावा तसेच सामाजिक ऐक्य, सद्भावना वाढीस लागावी, सण उत्सव साजरे करताना समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेवून संवाद व्हावा आणि वैचारिक बांधिलकी आणि समाजात जिव्हाळा निर्माण होऊन सबंध मानवतेला प्रेमाची,आपलेपणाची प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवून मा. शेख सुभानअली सर यांच्या उपस्थितीत तसेच त्यांच्या
मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन तर्फे आयोजित करण्यात आले होते.बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन कडून मा. शेख सुभानअली सरांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रातील शोषित, पिडीत, वंचित बांधव,अनाथ मुले, निराधार आणि विधवा माता-बहिणी, आत्महत्याग्रस्त शेतक-याचे कुटूंब यांच्यासोबत ईद साजरी करीत आहे. दरवर्षीच्या कार्यक्रमात शिरखुर्मा मेजवानी बरोबरच गरजुंना कपडे भेट देण्यात येतात.आपले संबोधित भाषण करताना मा. शेख सुभानअली सर यांनी सर्वप्रथम उपस्थित समाजबांधवांची, आई-बहिणींची माफी मागितली की, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास खुप उशीर झाला. आम्ही आजपर्यंत अनेक ईद तुमच्याशिवाय, तुम्हाला सोडून साजरी केली. इस्लाम आम्हास शिकवतों की, पृथ्वीतलावरील सर्व मानव एकच आहेत. आपण सर्वजण एकमेकांचे भाऊ-भाऊ आहोत.
अल्लाह हा सर्व जगाचा पालनहार आहे. फक्त मुस्लिमांचा नव्हे, हजरत मुहम्मद पैगंबर (स.) हे संपूर्ण जगासाठी कृपावंत आहेत. फक्त मुस्लिमांसाठी नव्हे. भारतात जवळपास २० कोटी मुस्लिम बांधव असुन कोणी भाऊ-बहिण जर उपाशीपोटी झोपत असेल तर आम्ही मुस्लिम होऊच शकत नाही. सर्व बहुजन बांधवांत एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे, सांप्रदायिक सदभाव आणि सलोना बाढविणे, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, देशसेवा आणि मानव सेवेस समर्पित
चुवा पिढी तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,बहुजन युवकांनी काही राजकारण्यांच्या मानवता विरोधी, देशविरोधी मानसिकतेला बळी पडू नये आणि आपण सर्व मानव सेवेसाठी या जगात आलो आहे अशा कार्यक्रामांच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन आपले सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक धोरणांबाबत मार्गदर्शन घेणे येणा-या काळात खुप गरजेचे
आहे असे मोलाचे मार्गदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन लोणी भापकर गावातील चौद्ध समाज मंदिर, मातंग समाज मंदिर, चांपड़े वस्ती (धनगरवाडा), या तिन्ही ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक, तरुण, माता-भगिनी, विद्यार्थी, लहान मुले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.शेख सुभानअली सर ( सचिव - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), जमीरभाई खान, तसेच लोणी भापकर गावचे सरपंच मा. रविकाका भापकर, माजी सरपंच मा. विजय बारवकर, पोलिस पाटील मा. संजय गोलांडे, मा. गोविंद भापकर, मा. विजय गोलांडे, मा. नवनाथ भापकर, मा. अविनाश बनसोडे, मा. पदम कडाळे, मा. चेतन मोरे, मा. बापू कडाळे, मा. नितीन सकाटे, मा. संदिप कडाळे, मा. महादेव चोपडे सर, मा. प्रदिप गोलांडे, मा.भिमराव पवार, मा, विजय यादव, सचिन भोईटे, फारुख काझी, मुबीन अत्तार, मोहसीन कारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. एजाजभाई अत्तार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्तविक
मा. मुनीरभाई तांबोळी यांनी केले तसेच हजरत मुहम्मद पैगंबर सर्वांसाठी अभियान २०२२ बाबत
माहिती सांगितली व मौजे लोणी भापकर गावचे माजी सरपंच मा. विजय बारवकर यांनी सर्वांचे
आभार मानले.हजरत मुहम्मद पैगंबर सर्वांसाठी अभियान २०२२ या अभियानांतर्गत ईद मिलन
कार्यक्रम आयोजक- बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशनचे मार्गदर्शक तसेच शाहू, फुले, आंबेडकर
अभ्यासक मा. मुनीरभाई तांबोळी (अध्यक्ष-तांबोळी जमात, बारामती शहर), बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जहिरभाई पठाण, सदस्य एजाजभाई अत्तार, सचिन भोईटे, फारुख काझी, मुबीन अत्तार, मोहसीन काझी यांचा मौजे लोणी भापकर गावचे सरपंच मा. रविकाका भापकर तसेच समस्त ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल
अभिनंदन करण्यात आले.गावातील ईद मिलनच्या कार्यक्रमावेळी गावात खुप उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. असे सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे कार्यक्रम, अभियान वेळोवेळी प्रत्येक समाजात साजरे
व्हावे असे कौतुकास्पद उद्गार मौजे लोणी भापकर गावातील ग्रामस्थंकडून करण्यात आले. सर्व गावात तसेच तालुक्यात हजरत मुहम्मद पैगंबर (स.) अभियान २०२२ अंतर्गत बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन आयोजितईद मिलन कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहेत.
बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन कडून येणा-या काळात प्रत्येक वेळी सामाजिक
एकात्मता व राष्ट्रीय एकात्मता सशक्त करुन मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण करण्यासाठीचा एक प्रयत्न......अशी माहिती
मुबीन अत्तार (सचिव)बारामती सोशल चॅरिटेबल फौंडेशन, बारामती यांनी दिली.
No comments:
Post a Comment