हद्दच झाली..महिलेचे नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटसला;तेही भेटण्यास नकार दिल्याने.. गुन्हा दाखल.!
बारामती:- ऐकावे ते नवलच बारामतीत काय न काय घडत असते तर महिलांवर होत असलेले अत्याचाराचे प्रमाण देखील वाढत चालले आहे नुकताच बारामती तालुक्यातील सांगवी (ता. बारामती) येथे एका महिलेशी सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करताना त्याचे व्हिडीओ, फोटो काढले, तिने भेटण्यास नकार दिला असता हे व्हिडीओ व फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्याचा प्रकार घडला.याप्रकरणी लक्ष्मण मच्छिंद्र वीर (रा. रांजणगाव, ता.पैठण, जि. औरंगाबाद) याच्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवीच्या एका वस्तीवर राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली. वीर याची बहीण फिर्यादी महिलेच्या शेजारी राहात होती. तो बहिणीकडे राहायला असताना सप्टेंबर २०२१ मध्ये दोघांची ओळख झाली.तिचा पती कामाला गेल्यावर तो तिच्या घरी बसण्यासाठी येत होता. यातून त्याने तिच्याशी गोड बोलून शरीरसंबंध
प्रस्थापित केले. त्यानंतर या दोघांमध्ये वारंवार तिच्या राहत्या घरी, लॉजवर शरीरसंबंध होऊ लागले. त्याने त्यावेळी व्हिडीओ व फोटो काढले.फेब्रुवारी २०२२ मध्ये तो त्याच्या गावी निघून गेला.त्यानंतर २५ एप्रिल २०२२ रोजी त्याने फोन करत फिर्यादीला लॉजवर भेटायला बोलावले. तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्याने तिने नकार दिला. त्याच दिवशी
त्याने तिला दोघांचे नग्न फोटो पाठवले. तसेच तू जर मला भेटायला आली नाहीस तर हे फोटो तुझ्या पतीला व भावाला पाठवीन, अशी धमकी दिली. फिर्यादीने ही बाब तिच्या पतीला सांगितली. त्यानंतर काही वेळातच त्याने तिच्यासोबतच्या संबंधाचा व्हिडीओ तिला पाठवला, तरीही फिर्यादीने त्याला दाद दिली नाही.त्यानंतर दि. २७ मे रोजी त्याने स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसला दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो ठेवले.फिर्यादीने त्याचा स्क्रीनशॉट काढत पोलिसांत फिर्याद दिली.अधिक तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment