प्रा.गोरख साठे सर बारामती यांची भारतीय कर्मचारी मजदूर युनियन (इंटक) नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सरचिटणीस पदी निवड...
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी दि.12.06.2022 ):- भारतीय कर्मचारी मजदूर युनियन नवी दिल्ली येथील बी. के.एम्.यु. राष्ट्रीय पातळीवर कार्यकारिणी मध्ये केंद्रिय राष्ट्रीय सरचिटणीस पदी बारामती येथील महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या शारदानिकेतन इंग्लिश मेडिया स्कूल व ज्यु कॉलेजचे अध्यापक प्रा. गोरख साठे सर जळोची बारामती यांची अधिकृत नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रीय कार्यकारिणौच्या सरचिटणीस पदी निवड केल्याचे भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमपाल गोयल गुरूजी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मत प्रतिपादन केले आहे. प्रा. गोरख साठे बारामती यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमपाल गोयल गुरुजी यांनी देशभर या संघटनेचे जाळे निर्माण केले असुन उभ्या भारतात संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत व संघटनात्मक कामकाज वाढविण्यासाठी देशातील विविध राज्यातील मजुर; कामगार; सफाई कर्मचारी; मजदूर, गोरगरीब जनतेच्या अन्याय अत्याचार विरुद्ध संघटनात्मक कामकाज वाढविण्यासाठी देशातील विविध राज्यात सर्व स्तरातील कर्मचारी मजुर यांना न्याय मिळवून देण्यासाठी भरीव योगदान देऊ व राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमपाल गोयल गुरूजी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सेवा भावी वृत्ती ठेवून आत्मसमर्रपीत होऊन कामगारांना न्याय व विशेष सहाय्य करून कर्मचारी मजदूर कर्मींचा अन्याय अत्याचार विरुद्ध संघटनात्मक कामकाज वाढविण्यासाठी देशातील विविध ठिकाणी संघटना मजबूत करू असे मत प्रा.गोरख साठे बारामती यांनी मत नियुक्ती नंतर प्रतिपादन केले.देशातील विविध राज्यातील मजुर कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रा. गोरख साठे बारामती यांचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून प्रा. गोरख साठे यांचे अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment