निर्भिड निर्भया ने केला नामचीन गुंड वर बलात्काराचा गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

निर्भिड निर्भया ने केला नामचीन गुंड वर बलात्काराचा गुन्हा दाखल...

निर्भिड निर्भया ने केला  नामचीन गुंड वर बलात्काराचा गुन्हा दाखल...

बारामती:- बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखा वरील नामचीन गुंड रोहित केशव जगताप वय 28 वर्ष राहणार कसबा. तालुका बारामती याने बारामती मधीलच एका निर्भया महिलेचे तिच्या मुलाचे अपहरण करून मारून टाकण्याची धमकी देऊन तिला कोणी जवळचे नातेवाईक नाही हे पाहून  व स्वतःची असणारी दहशत या जोरावर मोरगाव रोडच्या सिकंदर नगर भागात बोलून त्याठिकाणी काटेरी झुडपांमध्ये तिच्यावर काल दुपारी बारा वाजता लैंगिक अत्याचार केला. तेवढ्यावर त्याची शारीरिक भूक शमली नाही तर सदर निर्भया ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी येऊन परत त्या ठिकाणी गोंधळ करून त्यांची इच्छा पूर्ती करण्याची मागणी परत केली तिला त्याने नकार दिला असता तिच्या घरी जाऊन तिच्या दरवाज्याची तोडफोड केली.
 सदर महिलेने कोणतीही तमा न बाळगता सदर पोलीस स्टेशन गाठून बलात्कार केल्याचा हकिगत सांगितली पोलिसांनी सदर महिलेचा जबाब तात्काळ नोंदवून रोहित केशव जगताप वय 28 वर्षे कासबा याला ताबडतोब उचलून आणून त्याच्यावर भादवि कलम 376 427 506 504 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक माननीय मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील उपनिरीक्षक युवराज घोडके तसेच पोलीस हवालदार शिंदे इंगळे हे करत आहेत

यापुढे कोणत्याही महिलेची कुणाविरुद्ध ही लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क करावा तात्काळ कारवाई करण्यात येईल.

No comments:

Post a Comment