बापरे.. बेहिशोबी मालमत्ता कमविण्याऱ्याची आत्ता गय नाही,तत्कालीन तहसीलदार यांनी जमवलेल्या लाखोंची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सहा वर्षांनी झाली अटक..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 19, 2022

बापरे.. बेहिशोबी मालमत्ता कमविण्याऱ्याची आत्ता गय नाही,तत्कालीन तहसीलदार यांनी जमवलेल्या लाखोंची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सहा वर्षांनी झाली अटक..!!

बापरे.. बेहिशोबी मालमत्ता कमविण्याऱ्याची आत्ता गय नाही,तत्कालीन तहसीलदार यांनी जमवलेल्या लाखोंची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सहा वर्षांनी झाली अटक..!!                        कळंब:-  सद्या महाराष्ट्रात लाचलुचपत विभागाची कारवाई जोरात चालू आहे यावरून किती भ्रष्टाचार चालू आहे हे दिसत आहे तर काही अधिकारी रिटायर्ड झाली असली तरी आत्ता त्यांची गय नाही त्यांच्या बेहिशोबी मालमत्ताची चौकशी होणारच याचे नुकताच घडलेल्या प्रकरणावरून दिसत आहे,कळंब येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना वैशाली नामगोंडा पाटील हिने अवैध मार्गाचा अवलंब करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
(एसीबी) करण्यात आली होती. त्या अनुषंगाने एसीबीने पाटील हिने मार्च २००८ ते ३० जून २०१६ या काळात अवैध मार्गाने कमावलेल्या संपत्तीची चौकशी केली. त्यात तिने सर्व ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत २२ लाख ४ हजार ३३७ रुपये म्हणजेच २९ टक्के अधिक काली कामे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्याविरोधात कळंब पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला असून महिला तहसीलदार यांना अटक करण्यात आलेली आहे.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून या त्यानंतर तिच्याविरोधात कळंब पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला तहसीलदार यांना अटक करण्यात आलेली
आहे.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.कळंब येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना वैशाली नामगोंडा यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू असतांना त्यांची
गंगापूरच्या जामगाव येथील महाराष्ट्र शेती महामंडळाच्या स्थावर व्यवस्थापक
म्हणून बदली झाली होती.लाचलूचपत विभागाच्या चौकशीत वैशाली यांनी २००८ ते २०१६ या काळात अवैध मार्गाने २२ लाखांची
बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले होते. उस्मानाबादच्या एसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांनी गंगापूर पोलिस तसेच महाराष्ट्र शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने यांनाही या कारवाई संदर्भात पत्र पाठवून माहिती दिली.पोलिसांच्या पथकाने गंगापूर शहरातील लासूर रोडवरील राहत्या घरातून नामगोंडा पाटील यांना अटक
केली.अटकेनंतर एसीबीचे पथक नामगोंडा पाटील यांना कळंब येथे घेऊन गेले.न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे.

No comments:

Post a Comment