वटपौर्णिमेनिमित्त ' विधवा प्रथा बंदी प्रबोधन' कार्यक्रम संपन्न...!
बारामती:- येथील रागिनी फाऊंडेशन आणि आझाद तरूण मंडळ सणसर यांच्या संयुक्त विद्यमाने सणसर येथे विधवा प्रथा बंदी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात चालत आलेली अनिष्ट विधवा प्रथा नष्ट होऊन प्रत्येक महिलेने स्वतंत्रपणे जगले पाहिजे. घरातील कर्तव्यदक्ष पुरुषाच्या निधनाने आता कुटुंबावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महिलेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समाजात वावरत असताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अनेक पारंपारिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही, अपमानास्पद वागणूक दिली जाते. परंतु आता महिलांनी पुढाकार घेऊन, प्रथा बंद केली पाहिजे, विधवांना देखील सामाजिक स्थान दिले पाहिजे. या हेतूने वटपौर्णिमेनिमित्त
विधवा महिलांना हळदीकुंकू लावून विधवा प्रथा बंदी प्रबोधनाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मंगल ताई बोरावके, सुमन जाचक, चंद्रकांत दादा निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून महिलांना प्रेरित केले. आपल्याला सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी आपण देखील पुढारलेल्या विचाराने समाजात वावरले पाहिजे, आपल्यासाठी सरकार करत असलेल्या बदलांचा अंगीकार करून ते स्वीकारले पाहिजेत असे विचार त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ३५ वर्ष श्री छत्रपती सहकारी कारखान्यांमध्ये यशस्वीरित्या सेवा करून निवृत्त झालेले श्री.प्रकाश उर्फ आबा शिंदे अध्यक्ष कामगार कल्याण मंडळ पुणे(ग्रामीण) यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल रागिनी फाऊंडेशन व सणसर ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याकार्यक्रमाप्रसंगी ज्योत्स्ना भोईटे, तारा भाग्यवंत, राजाभाऊ चव्हाण, परशुराम रायते, रवींद्र भोईटे ,पिंटू गुप्ते अमोल भोईटे, जगदीश कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment