जातीय अत्याचार पिडीतास २४ तास संरक्षण देवून आरोपी यास अटी व शर्तीवर जामिन मंजूर ...
बारामती:दिनांक ०३/०६/२०२२ रोजी बारामती येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री. जे. पी. शेख
सो यांनी यवत पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. २६९/२०२२ या गुन्हयातील फिर्यादी दत्तात्रय गणपत
चव्हाण यास २४ तास संरक्षण देगेकामी आदेश करून आरोपी नामे रमेश बाबू करडे यास अटी व
शर्तीवर जामिन गंजूर केला. सविस्तर हकीकत खालील प्रमाणे :-दिनांक २९/०३/२०२२ रोजी दापोडी, ता. दौंड, जि. पुणे येथील आरोपी नामे रमेश बाबु करडे व इतर चार यांनी फिर्यादी यांचा मुलगा व आरोपी यांची मुलगी यांचे मध्ये असलेल्या प्रेमसंबंधातून त्यांनी आंतरजातीय विवाह केल्याने जातीय व्देषाने चिडुन जावुन फिर्यादी व त्यांचे कुटूंबातील लोकांना
मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिलेली होती सदर बाबत फिर्यादी यांनी सदरील आरोपी व इतर यांचे विरुध्द यवत मोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२६९/२०२२ भा.द.वि. कलम ३२७, ३२४,५०४,५०६ व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अधिनियम १९८९ वे कलम ३ (१) (आर) ३ (१) (एस) ३ (२) (व्हीए) व नागरीक हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मधील कलम ७ (१) (डी) अन्वये फिर्याद दाखल केली होती, त्याप्रमाणे सदर गुन्हयातील आरोपी नामे रमेश बाबु करडे यास पोलीसांनी अटक केलेली होती. सदर अटकेनंतर
सदरील आरोगी याने बारामती येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जागिन गिळणेकामी अर्ज
दाखल केलेला होता.सदर जामिन अर्जाची सुनावणी कामकाज अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतीबंध कायदा अधिनियम १९८९ चे कलम १५ (ए) (१०) मधील अनिवार्य निर्देशानुसार मा. न्यायालयाचे आदेशाने खुलया न्यायालयामध्ये व्हिडीओ रेकॉर्डींगमध्ये करणेत आले तसेच सदर गुन्हयाच्या यापुढील तपासाची संपूर्ण कारवाई व्हिडीओ रेकॉर्डींग मध्ये करण्यात येणार असलेबाबत लेखी रिपोर्ट मा.
न्यायालयात तपासी अधिकारी तथा मा. पोलीस उपविभागीय अधिकारी सो दौड यांनी सादर केले आहे.सदर अर्जामध्ये अत्याचार पिढीत/ आश्रीत यांचे तर्फे अॅड. अंबादास बनसोडे, अॅड. दिपक
लोंढे यांनी कामकाज पाहिले तर सोबत त्यांचे सहकारी अॅड. उमेश गवळी, अॅड. रविंद्र वानखेडे व संघर्ष आपटे, रविंद्र गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर अर्जामध्ये अत्याचार पिडीत/ आश्रीत यांचे तर्फे अॅड अंबादास बनसोडे यांनी केलेला युक्तीवाद व कोर्टासमोर आणलेली सत्यपरिस्थिती यावरून प्रस्तुत गुन्हयाचे गांर्भीय पाहुन मे कोटांने फिर्यादी व त्यांचे कुटुंभिय यांना २४ तास पोलीस संरक्षण देवून आरोपी यास अटी व शर्तीबर जामिन मंजूर केला. मा. न्यायालयाचे निर्णयावर व्यधीत होवून अत्याचार पिडीत तर्फे अॅड. अंबादास बनसोडे यांनी मा. न्यायलयाचे आदेशाविरुध्द मा. उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे कळविले आहे.अशी माहिती रविंद्र त्रिंबक गायकवाड यांनी लेखी पत्राद्वारे दिली.
No comments:
Post a Comment