डॉ.विद्युतचंद्र गोविंददास शहा (अकलूज ) यांना भारत रत्न डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीरः
बारामती (विशेष प्रतिनिधी):-संग्राम नगर अकलूज येथील सुप्रसिद्ध युरोसर्जन
डॉ.विद्युतचंद्र गोविंददास शहा यांना डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय सन्मान पदक देऊन येत्या 13जुलै 2022रोजी दिल्ली येथे 14व्या लोकसभेच्या माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मीराकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार
असल्याचे बाबु जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबाजी दिल्ली यांनी पुरस्कार नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे कळविले आहे असे महाराष्ट्र राज्य बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे राज्य सचिव प्रा. गोरख साठे यांनी वार्तालाप करताना जाहीर केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील अद्वैतीय योगदाना बद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.गेल्या 45वर्षात माफक दरात ग्रामीण भागातील रुग्णांचे सेवा कार्याची दखल अकादमीच्या वतीने घेतली असून त्यांना भारत रत्न डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment