१२ वी च्या निकालात कु. श्रद्धा विरेंद्र गायकवाड हिची ९१ टक्क्यांची उतुंग भरारी.... बारामती:- नुकताच १२ वी चा निकाल जाहीर झाला यामध्ये मुलींनी जास्त बाजी मारली तर वसंतनगर बारामती येथील टकारी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक भारत ज्ञानोबा गायकवाड यांची नात व श्री व सौ. स्मिता विरेंद्र गायकवाड यांची कन्या कु. श्रद्धा विरेंद्र गायकवाड हिने बारावीच्या निकालात आपला ठसा उमटवला तेही तब्बल ९१ टक्के नी पास झाली या उतुंग भरारी निकालाने परिवारात, समाजात नातेवाईक मित्र परिवार हे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे,तर १२ वी निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बारावी परीक्षेत पास झालेल्या मुली व मुलांना शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा संदेश आहे की, बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीन कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा,असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनी
जास्त मार्क मिळवलेत. सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment