सुनिल (आण्णा) शिवाजी पाटोळे यांची पुरंदर तालुका भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी नियुक्ती; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव;
नवी दिल्ली :(दि.7.06.2022)
भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी निरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष व निरा येथील आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुनिल (आण्णा) शिवाजी पाटोळे यांची नियुक्ती भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रेमपाल गोयल गुरूजी यांनी केली असल्याचे केंद्रीय सचिव प्रा.गोरख साठे बारामती यांनी वार्तालाप करताना कळविले आहे. सुनिल (आण्णा) पाटोळे हे सोमेश्वरनगर येथील कारखाना परीवारातील शाळेत कर्मचारी म्हणून गेली 36वर्ष कार्यरत आहेत .सामान्य कामगाराच्या दैनंदिन समस्यांचा त्यांनी अभ्यास केला असून दरवर्षी देशातील मान्यवर व्यक्ती;थोर महापुरूष यांच्या जयंती दिना निमित्त ते विविध संस्थांचे प्रतिनिधी यांना दरवर्षी पुरस्कार देऊन ते गौरव करतात.
कामगारांना न्याय व विशेष हक्क देण्यासाठी अहोरात्र मी कार्य करण्याचे सुनिल (आण्णा)पाटोळे यांनी मत व्यक्त केले. पुरंदर तालुका भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या अध्यक्षपदी सुनिल (आण्णा)पाटोळे यांची नियुक्ती केली असून सर्व समाज स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment