घोडेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेली..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 5, 2022

घोडेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेली..!

घोडेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेली
************************
    (कैलास गायकवाड)
 आंबेगाव तालुका प्रतिनिधी- ता.४/६/२०२२:- शिरदाळे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे.२६/२/२०२१ रोजी खडी ची वाहतूक करणाऱ्या विना नंबरची ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली होती. सदर ट्रॅक्टर व ट्रॉली घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली होती.७/८/२०२१ रोजी ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीस केल्याचे लक्षात आले. सदर ट्रॅक्टर व ट्रॉली चा सगळीकडे शोध घेतला असता मिळून आली नाही. मंडळ अधिकारी दीपक मडके यांनी  घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर ट्रॅक्टर ट्रॉली चे मालक अजमद पठाण यांनीच चोरून   संशय तहसीलदार यांनी त्यांच्याच  पत्रात नमूद  केला आहे.
 याबाबत सविस्तर वृत्तांत असा २६/२/२०२१ रोजी शिरदाळे येथे विना नंबर चा न्यू हॉलंड कंपनीचा,निळ्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली अवैधरित्या खरी वाहतूक करताना कामगार तलाठी विशाल मुंगळे मंडलाधिकारी, एस.एम पवार यांनी ट्रॅक्टरचालक भास्कर भांगरे व अजमद  पठाण ( राहणार जांभवडे तालुका मावळ जिल्हा पुणे ) यांच्यावर कारवाई करून ट्रॅक्टर व ट्रॉली घोडेगाव तहसील आवारात उभी करण्यात आली होती. पंचनामा करून सदर बाबत फोन द्वारे तहसीलदार रमा जोशी यांना माहिती दिली होती. याबाबत सविस्तर अहवाल४/३/२०२२ रोजी दिला होता. तहसील कार्यालय येथे सुरक्षारक्षक  नसल्यामुळे सदर ट्रॅक्टर व ट्रॉली देखरेखीसाठी कोणाही नेमणूक करण्यात आली नव्हती.
७/८/२०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार उमेश सुदाम थोरात( रा.संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर ) यांचे सदर ठिकाणी सुशोभीकरणाचे काम चालू असताना, त्यांना ट्रॅक्टर व ट्रॉली  दिसून आली नाही. याबाबत त्यांनी निवासी नायब  तहसीलदार  अनंता  गवारी यांना कळविले होते.यांनी तहसीलदार यांना कळविले असता, याबाबत मंडळ अधिकारी योगेश पाडळे यांना लेखी आदेश देऊन, याबाबतचा गुन्हा घोडेगाव पोलीस स्टेशन येथे नोंद करा. व त्याचा अनुपालन अहवाल आदर करणे बाबत सांगितले होते. परंतु सदरचे मंडळ अधिकारी योगेश पाडळे यांच्यावर  निलंबनाची कारवाई झाली असल्यामुळे तहसीलदार यांनी तत्कालीन मंडलाधिकारी घोडेगाव एस एम पवार यांना ट्रॅक्टर व ट्रॉली  बाबत गुन्हा नोंद करणे आदेश दिला होता. त्यानंतर मंडलाधिकारी घोडेगाव एस एम पवार वैद्यकीय रजेवर असल्यामुळे तहसीलदार यांनी दिनांक २१/३/२०२२व ९/५/२०२२ रोजी मंडलाधिकारी दीपक मडके यांना लेखी आदेश देऊन ट्रॅक्टर चोरीबाबत गुन्हा नोंद करण्यास सांगितले. मनपा अधिकारी मडके यांनी सदर ट्रॅक्टर ट्रॉली चा शोध घेतला असता, मिळून न आल्यामुळे याबाबत घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.

No comments:

Post a Comment