बारामतीत कॅनॉलच्या सिमेंट काँक्रीट मुळे पुन्हा गेला जीव?मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल का? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

बारामतीत कॅनॉलच्या सिमेंट काँक्रीट मुळे पुन्हा गेला जीव?मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल का?

बारामतीत कॅनॉलच्या सिमेंट काँक्रीट मुळे पुन्हा गेला जीव?मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल का?                                               बारामती:- वादग्रस्त चे संपादक संतोष जाधव यांनी 20 मे रोजी बातमी प्रसिद्ध केली होती की, बारामतीच्या कॅनॉल मध्ये केलेल्या सिमेंट काँक्रीट मुळे कॅनॉल मध्ये एखादा व्यक्ती पडला तर तो वरती येऊ शकत नाही,तर जीव जाऊ शकतो यासाठी पडलेल्या व्यक्तीला वर येण्यासाठी सिमेंट कॉक्रीटीकरण केलेल्या ठिकाणी कप्पे अथवा पकडण्यासाठी कडे केले पाहिजे होते परंतु प्रशासन मात्र याकडे काना डोळा करीत राहिले आणि पुन्हा एक जीव गेला याला जबाबदार कुणाला धरायचे हा अश्या संतप्त भावना व्यक्त होत आहे,तर अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार आहे हे प्रशासन हे येणाऱ्या काळ ठरवेल, नुकताच सकाळी कॅनॉल मध्ये एक महिला वाहत आली होती या महिलेचे नाव सरस्वती गुणवंत तोंडारे वय 67 वर्ष राहणार भिगवण हे आहे सदरची महिला आपल्या मुलीकडे राहण्यासाठी 2 दिवसापूर्वी  ओझर्डे ईस्टेट टीसी कॉलेज जवळ आलेली होती सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी ती कॅनॉल वर गेली होती सदर महिला वॉकिंग करत असताना कॅनल मध्ये पडून तिचा मृत्यू झाला असावा असे नातेवाईक यांनी सांगितलेले आहे. सदर महिलेचे पती हे रिटायर्ड पोलीस कर्मचारी असून ते भिगवन या ठिकाणी स्थायिक आहेत. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार करे हे सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत  पाण्यात बुडालेली महिला पुला जवळ लोकांना दिसली पोलिसांनी तत्काळ बिट मार्शल ठोंबरे व मनोज पवार  यांनी जनतेचे सहकार्याने वर काढली होती कॅनॉल मध्ये पोहताना ज्याला पोहता येते त्यांनी सुद्धा काळजी घ्या कारण अंग कोरडे असताना कॅनॉल मध्ये पोहण्यास गेला नंतर कॅनॉल चे सिमेंट अस्तरीकरण झाल्याने अंग ओले झाल्यानंतर वरती चढता येत नाही बाहेर काढणे पण जिकरीचे होते . नंतर प्रवाहात अडकला की दम लागतो आणि त्यातून गटांगळया बसून अनुचित प्रकार होऊ शकतो. पूर्वी माती गवत पकडुन वरती येता येत होते असे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment