बारामतीचे भूमीपुत्र लोकनेते स्व. मारुतराव जाधव यांच्या १०२ जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.. बारामती:- दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लोकनेते मारुतराव जाधव प्रतिष्ठाण बारामती, जि. पुणे. यांच्या वतीने बारामतीचे भूमीपुत्र लोकनेते स्व. मारुतराव जाधव यांच्या १०२ जयंतीनिमित्ताने
रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळी रक्तदान शिबिर लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक सिल्व्हर ज्यूबिली सहकारी रुग्णालय नजिक, बारामती जि. पुणे.याठिकाणी आयोजित केले होते यावेळी अनेकांनी रक्तदान केले या कार्यकमासाठी बारामती सह. बँकेचे चेअरमन सचिन शेठ सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, मा. उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड,कॉग्रेस आय चे जेष्ठ नेते अशोक इंगुले, संतोष जाधव, महेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मोहन पंजाबी,दिनकर जाधव,संजय गायकवाड, रमेश जाधव, प्रल्हाद जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते तर डॉ सिसोदिया व त्यांच्या स्टॉप नी सहकार्य केले तर
कार्य हीच ओळख फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, समीर बनकर (वृक्षवेडा) यांच्या विविध संकल्पनेतून साकार वृक्षारोपणाच्या वृक्षारोपण बनकर वस्ती, उंडवडी कडेपठार, बारामती.ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी सर्वांची उपस्थिती बद्दल निमंत्रकः राणी जाधव (सुप्रिया सोळांकुरे) समस्त जाधव परिवार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment