आम आदमी पार्टी दौड विभागाच्या वतीने वाहन नोंदणी, लायसेन्स वितरण साठी कॅम्प घेण्याची मागणी.. बारामती:- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार पाटील बारामती, जि. पुणे यांना आम आदमी पार्टी दौड च्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हंटले की,दौंड शहरातील वाहन नोंदणी, लायसेन्स वितरण इत्यादी कामे पुन्हा चालू करणे यावेत तसेच आपल्या कार्यालयामार्फत दौंड तालुक्यातील वाहन नोंदणी, ड्रायव्हींग लायसेन्स कामे व
इतर दुचाकी / चारचाकी वाहना संबंधीचे सर्व शासकीय कामे करण्यासाठी दौंड शहरात महिन्यातून चार वेळा आपण आपल्या सहकाऱ्यांसह कॅम्प आयोजित करीत होता. मध्यंतरी कोरोनामुळे सन २०२० पासून
आपल्या कार्यालयामार्फत सदरचा कॅम्प बंद करण्यात आला आहे. तो अद्याप चालू झालेला नाही.दौंड तालुक्यातील व शहरातील दुचाकी/चारचाकी वाहनधारकांना नवीन लायसेन्स काढणे, वाहनांची नोंदणी करणे, ट्रायल देणे इत्यादी आपल्या कार्यालयाशी संबंधित कामे करणे दौड शहरातील आपल्या महिन्यातील चार वेळा कॅम्पमुळे सोयीचे होते. सन २०२० पासून दौंड तालुक्यातील सर्व विद्यार्थी / महिला / नागरिक यांना प्रत्येक कामासाठी बारामतीला यावे लागते. अनेक नोकरदार /व्यावसायिक / विद्यार्थी यांना रजा काढून, व्यवसाय बंद करून व सुट्टी घेवून पुर्ण एक दिवस बारामतीसाठी
द्यावा लागतो. काही त्रुटी राहिल्यास हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांना येण्या-जाण्याचा खर्च व मनस्ताप सहन करावा लागतो.
आपणास विनंती आहे की, पूर्वी प्रमाणेच आपण महिन्यातील चार वेळा कॅम्प दौंड तालुकयासाठी पुन्हा चालू करावा व दौंड तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा अश्या मागणीचे निवेदन रविंद्र जाधव दौंड तालुका व शहर संयोजक यांनी केले.
No comments:
Post a Comment