संयुक्त भारत पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी: विनोद साळवे.!
---------------------------------------------
मुंबई प्रतिनिधी:- नवा पक्ष नवीन विचार घेऊन राष्ट्रीय पातळीवर भारत देशाची सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक,आरोग्य, शेती, उद्योग व्यापार, युवकांना रोजगार निर्मिती देशातील बेकारी व भ्रष्टाचार मुक्त भारताची निंर्मिती करुन जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून देण्यासाठी संयुक्त भारत पक्षाची स्थापना करण्यात आली असून ,केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रितसर नोंदणी करण्यात आली आहे
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष : मा अशोकजी बहादरे , राष्ट्रीय महासचिव : मा संभाजीराव जाधव , राष्ट्रीय कोषाध्यक्ष : मा ओंकार अय्यर आणि इतर पदाधिकारी यांच्या संमतीने सुप्रसिद्ध सामाजिक चळवळतील युवा नेते मा विनोद मनोहर साळवे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी मा अनिल दिगंबर काळने यांची निवड करण्यात आली आहे .
येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका , महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार असुन
नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष : मा विनोद मनोहर साळवे , प्रदेश सचिव : मा अनिल दिगंबर काळने यांना संयुक्त भारत पक्षासी संलग्न युवा , महिला, उद्योग व्यापार सेल, वकील संघटना, शिक्षक संघटना, कामगार संघटना, शेतकरी संघटना , व पत्रकार मित्र आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्या ना भावी राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
No comments:
Post a Comment