लोन रिकव्हरी एजंट करतात शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन,आता RBI कठोर पावले उचलण्याच्या तयारीत..
नवी दिल्ली :- नुकताच कोरोनाच्या महामारीतून व लौकडाऊन मधून लोक कसे बसे सावरू लागले असताना लोन वसुली करणार्यामुळे लोक हैराण झाले आहे,सहसा लोक आपत्कालीन परिस्थिती असताना किंवा अचानक गरज असताना कर्ज घेतात.बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि हप्ते चुकू लागतात. यानंतर बँकांचे कर्ज वसुली एजंट कर्जदाराला त्रास देऊ लागतात. कर्ज वसूल करणारे एजंट कधीही फोन कॉल करतात, लोकांना अपमानास्पद वागणूक देतात आणि गैरवर्तन करतात.या सर्व कृती बेकायदेशीर आहेत, परंतु आजकाल ते अगदी सामान्य झाले आहे. आता रिझर्व्ह बँकेनेही कर्ज वसुली एजंटच्या या
कृत्यांची दखल घेतली आहे. कर्ज वसूली एजंटचे कृत्य अस्वीकार्य रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, कर्ज वसुली एजंट लोकांशी गैरवर्तन करतात, जे अजिबात मान्य नाही.ते म्हणाले की, कर्ज वसुली एजंट कर्जदारांना कधीही फोन करून त्यांच्याशी गैरवर्तन करतात, जे अस्वीकार्य आहे. सेंट्रल बँक हे गांभीर्याने घेत आहे आणि कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही,दास यांनी मध्ये सांगितले की अशा प्रकारची कृत्य अनरेग्युलेटेड फायनान्स सामान्यतः कंपन्यांकडून केली जातात आणि रेग्युलेटेड केलेल्या कंपन्यांच्या बाबतीतही अनेकदा अशा तक्रारी प्राप्त होतात.कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही आरबीआयचे दास म्हणाले, रिझर्व्ह बँक रेग्युलेटेड केलेल्या संस्थांच्या बाबतीत गंभीर पावले उचलणार आहे. अनरेग्युलेटेड
कंपन्यांच्या अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर, लॉ एनफोर्समेंट एजन्सींना सूचित केले जाईल.अशा कोणत्याही तक्रारीवर कठोर कारवाई
करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. बँकांना
या उपक्रमांची जाणीव करून देण्यात आली आहे. रोज नवीन आव्हाने येतात. आम्ही
कर्जदार आणि सर्व बँकांना या संदर्भात विशेष लक्ष देण्याची विनंती करत आहोत.लोन रिकव्हरी एजंटचा असा करा सामना आरबीआयच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्ज वसुलीसाठी हाताच्या ताकदीचा वापर करणे किंवा धमकी देणे हे छळाच्या कक्षेत येत असेल तर उशीर न करता रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करा.याशिवाय, कर्जवसुली एजंटच्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जाण्यासाठी कर्जदारांकडे कायदेशीर मार्ग आहेत.कोणत्या उपायांनी तुम्ही वसूली एजंटचा त्रास टाळू शकता ते जाणून घेवूयात.. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, लोन रिकव्हरी एजंट वसुलीसाठी धमक्या किंवा छळ करू शकत नाहीत, मग ते तोंडी किंवा शारीरिक असो.कर्जदाराला वारंवार कॉल करणे किंवा सकाळी 9 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 6 नंतर कॉल करणे देखील त्रासदायक श्रेणीत येते.कर्ज वसुलीसाठी मसल पॉवर वापरणे किंवा धमकी देणे हे छळवणुकीच्या कक्षेत येते.एवढेच नव्हे तर कर्जदाराचे घर किंवा कामाच्या ठिकाणी न कळवता नातेवाईक,
मित्र किंवा सहकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे
आणि त्रास देणे हाही छळ आहे.धमक्या किंवा अपशब्द वापरणे देखील त्या कक्षेत येते.बँकेवर RBI लावू शकते दंड कर्ज वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असल्यास,तुम्ही सर्वप्रथम बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे.तसेच, बँकेला तुमची परिस्थिती सांगून, तुम्ही कर्ज परतफेडीच्या अटींवर काम केले पाहिजे.बँकेतील तक्रारीचे 30 दिवसांत निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे तक्रार करता येईल. रिझर्व्ह बँकेकडेही तक्रार करता येते.रिझर्व्ह बँक बँकेला निर्देशास आणून देऊ शकता आणि विशेष प्रकरणांमध्ये आरबीआय दंड देखील करू शकते.ग्राहकाकडे न्यायालयात जाण्याचाही पर्याय लोन रिकव्हरी एजंटने कोणतीही बेकायदेशीर कारवाई केली, प्राणघातक हल्ला केला किंवा कोणतीही मालमत्ता काढून घेतली,
तर कर्जदार पोलिसांकडे तक्रार करू शकतो.जर जास्त त्रास दिला गेला असेल तर वकिलाशी संपर्क साधून वसुली एजंटने जो अतिरेक केला आहे जसे की,चुकीचे पत्र लिहिणे किंवा कोणतीही चुकीची कारवाई करणे तर त्या आधारे न्यायालयातही जाता येते.कर्जदाराला लोकअदालत आणि ग्राहक न्यायालयात जाण्याचा पर्यायही असतो.
No comments:
Post a Comment