बापरे..बारामतीत वसंतनगर मध्ये चक्क 70 कबुतर गेले चोरीला,चोरांचं धाडस वाढतंय.! बारामती:-चोरीचे प्रमाण वाढत असून कोण काय चोरेल याचा भरोसा नाही,कारण चोरी करणारे अट्टल गुन्हेगार असल्याचे चोरीच्या प्रकारावरून दिसत आहे, या बाबत माहिती अशी बारामतीशहरातील वसंतनगर या भागात राहणारे व कबुतर प्रेमी दत्तोबा (नाना) जाधव यांचे एक दोन नव्हे तर तब्बल 70 कबुतर चोरीला गेले आणि तेही शर्यतीसाठी तयार झालेले कबुतर त्याची अंदाजे एकूण 50 ते 60 हजार रुपये किंमत असेल ही चोरी मंगळवारी रात्री 2:45 ते 3 च्या दरम्यान झाली असल्याचा अंदाज आहे लोखंडी जाळी कापून कबुतर ठेवलेल्या लाकडी बॉक्स च्या कडीचा कोयंडा कापून आत मधील 70 च्या आसपास असणारे कबुतर चोरून नेले ही चोरी करीत असताना घराच्या बाहेर कुणी येऊ नये म्हणून दाराची कडी लावली तसेच आजूबाजूला असणाऱ्या दरवाजाची कडी देखील लावली,cctv फुटेज मध्ये दोन टू व्हीलर वर सहा जण आल्याचे दिसत आहे,याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये सकाळी तक्रार दिली असून अजून दखल घेतली नसल्याचे सांगण्यात आले, कबुतर चोरीच्या घटनेची सर्वत्र बातमी पसरल्याने कबुतर प्रेमी या ठिकाणी येऊन भेटी देत आहे,तर पोलीस या घटनेची माहिती तपास करतील व काही तरी धागेदोरे सापडतात का हे पाहावे लागेल, या घटनेची माहिती कळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे की एवढ्या धाडसाने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कबुतर चोरीला जातात उद्या घरातील वस्तू चोरण्यासाठी धाडस करतील यासाठी तात्काळ अश्या चोरांना आळा घातला पाहिजे अशी भावना व्यक्त होत आहे.याबाबत कबुतर चोरीच्या प्रकरणातील आरोपी अथवा मोठया संख्येने असलेली कबुतर दिसल्यास किंवा काही संशय आल्यास स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कळविण्यात यावे असे कळविले आहे.
Post Top Ad
Wednesday, July 27, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बापरे..बारामतीत वसंतनगर मध्ये चक्क 70 कबुतर गेले चोरीला,चोरांचं धाडस वाढतंय.!
बापरे..बारामतीत वसंतनगर मध्ये चक्क 70 कबुतर गेले चोरीला,चोरांचं धाडस वाढतंय.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment