अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 9 आॅगस्ट ला मुंबई येथे क्रांती मैदानावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आत्मक्लेश आंदोलन करणार ..
पुणे प्रतिनिधी(नवनाथ खोपडे):-मुंबई येथील क्रांती मैदानावर करण्यात येणाऱ्या आत्मक्लेश आंदोलनाची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा दौऱ्यात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करुन शेवटी पुण्यात जुन्या नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना आत्मक्लेश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा आदेश दिला.
यावेळी उपस्थित असलेल्या भरगच्च सभेत महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप आणि राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे यांनी पुणे शहर अध्यक्ष पदी प्राध्यापक वैभव शिळीमकर व पुणे महिला अध्यक्ष पदी सौ. सुवर्णा भरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. पुणे शहर युवक अध्यक्ष पदी मयुरेश पाटील यांची निवड करण्यात आली. सौ. लीलावती घुले यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, मुंबई चे सुरज बर्गे, प्रा. अविनाश ताकवले, तुषार शेळके, सौ. लिनाताई रणपिसे यांचे सह युवक महिला विद्यार्थी इतिहास परिषद , शेतकरी, उद्योग, बहुजन आघाडी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.अशी माहिती तुषार तुळशीराम शेळके पुणे जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी दिली.
No comments:
Post a Comment