कोण नाराज तर कोण समाधानी..जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या
निवडणुका स्थगित झाल्याने इच्छुक उमेदवारांचे उमटल्या प्रतिक्रिया..!
मुंबई:- काही इच्छुक उमेदवार गुडग्याला बाशिंग बांधून तयारीत होते तर काही उमेदवारांची अजून तयारीच झाली नव्हती पण अचानक जाहीर झालेल्या निवडणूका कुणाला चिंतेची होती तर कुणाला आनंदाची होती पण पुन्हा ह्या निवडणूका स्थगित झाल्या याबाबत राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगरपरिषदा आणि नगरपंचायती च्या
निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी
आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी
होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात
होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात
येणार निवडणूक आहे.कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात
आलेली आचारसंहिताही लागू होणार नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, नाना
पटोले , पंकजा मुंडे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली होती. हे प्रकरण कोर्टात गेलेय. त्यामुळे आता 19 तारखेनंतरच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment