*बारामती शहर पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडुन ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस केले हस्तगत* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 14, 2022

*बारामती शहर पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडुन ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस केले हस्तगत*

 *बारामती शहर पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडुन ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस केले हस्तगत* 

    बारामती:- बारामती शहर पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडुन ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस केले हस्तगत करण्यात आला सदर बाबत अधिक माहिती अशी की, मा. श्री अभिनव देशमुख , पोलीस  अधीक्षक पुणे ग्रामीन यांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणा-या इसमां विरोधात विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुशंगाने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेप्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना  सहा पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ बारामती रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या मोकळ्या जागेत यांना  एक इसम गावठी पिस्टल घेवून थांबलेला आहे.सदरची बातमी पोलीस निरीक्षक सुनील महाडीक बारामती शहर पोलीस स्टेशन यांना सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करणेचे आदेश दिले . त्यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला असता   मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील  वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसले. सदर इसमांची व पोलिसांची नजरा नजर होताच् तो इसम त्या ठिकाणावरून पोलीसांची नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला स्टाफचे मदतीने त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडुन नाव व पत्ता विचारता त्याने त्यांचे नाव सलमान अबू थोटे वय २६ वर्षे रा.घर न ५, पाचवण , निजामपुरा, भिवंडी , ठाणे  हल्ली रा फुरसुंगी पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे डावे बाजुचे कंबरेस पॅन्टच्या आत मध्ये एक २५,०००/- रुपये किंमतीचे पिस्टल व पॅन्टचे डावे खिश्यात २००/-रुपये किंमतीचे ०२ जिवंत काडतुसे असा एकुण २५,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर घरफोडी व चोरी असे गंभीर प्रकारचे गुन्हे भिवंडी येथे दाखल आहेत.सदरची कामगिरी मा. श्री. अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीन, श्री. मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, श्री.गणेश इंगळे  उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग,    पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडीक ,  यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस अंमलदार अनिल सातपुते, रामचन्द्र शिंदे, गौरव ठोंबरे, अभिजित कांबळे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, दशरथ इंगोले  यांचे पथकाने केली.

           

No comments:

Post a Comment