पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण बनले 'मंगळसूत्र'..पत्नीने मंगळसूत्र काढणं ही मानसिक क्रूरता.! उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 15, 2022

पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण बनले 'मंगळसूत्र'..पत्नीने मंगळसूत्र काढणं ही मानसिक क्रूरता.! उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण.

पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण बनले 'मंगळसूत्र'..पत्नीने मंगळसूत्र काढणं ही मानसिक क्रूरता.! उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण.
मद्रास:- मद्रास हायकोर्टाने एका प्रकरणात महत्वाचा निर्वाळा केला आहे. एखाद्या पुरुषाची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले
असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रूरता समजले जाईल, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी न्यायालयाकडून पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती व्ही एम वेलुमणी  आणि न्यायमूर्ती एस. साँथर
यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी.शिवकुमार  यांच्या याचिकेवर सुनावणी केली. तर, पती-पत्नीच्या
घटस्फोटाचे कारण 'मंगळसूत्र' बनले असून
याबाबत न्यायालयाने पतीची याचिका मंजूर केली आहे.नेमकं प्रकरण काय आहे? स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा  15 जून 2016 रोजीचा
आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.
पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता
त्यामुळे याप्रकरणी महिलेची चौकशी केली.
त्यादरम्यान, विभक्त होण्याच्या वेळी तिने
तिच्या लग्नाचे प्रतीक म्हणून एक सोन्याची
साखळी घातली होती. मात्र आता त्या महिलेने
ती साखळी काढून टाकली आहे. असं तिने
कबूल केले. तसेच, मी केवळ साखळी काढून ते
सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे त्या महिलेने
सांगितले.गळ्यात तो सोन्याचा ऐवज घालण्याची
आवश्यक नाही आणि त्यामुळे त्या महिलेने तो
काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर
कोणताही परिणाम होणार नाही.असं महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा पुरावा देत सांगितले.

No comments:

Post a Comment