लैंगिक अत्याचार करायला...पोलिसांनी दोघांना केली अटक...!
बारामती:- कोण म्हणतंय दारू धंदे बंद आहे, पहा दारूच्या आहारी जाऊन कोण काय करेल कोणत्या थराला जाईल, तर कितीजणांचे संसार उदवस्थ झालेले पाहायला मिळत आहे, नुकताच एक विचित्र व पती पत्नी च्या नात्याला काळिमा फासण्याचे काम खुद्द पतीनेच केले बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे आपल्याच पत्नीशी मित्राला शारीरीक संबंध ठेवायला लावले.याबाबत
तांदूळवाडी येथील पिडीतेने काल रात्री यासंदर्भात बारामती तालुका पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी लागलीच बलात्काराचा व
लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याबाबतचा गुन्हा
दाखल करून पती व त्याचा मित्र शेखर सयाजी
माळशिकारे (रा. बेलदारपाटी, तांदूळवाडी. ता.
बारामती) यास अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार पिडीत महिला तिच्या पतीसह तांदूळवाडी परिसरात राहते. या पिडीत महिलेच्या घरी माळशिकारे हा अनेकदा येत होता.काल रात्री माळशिकारे हा पिडीत महिलेच्या पतीसह तांदूळवाडी येथील घरी आला. त्यावेळी
दारुच्या नशेत असलेल्या पतीने माळशिकारे
याच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवण्याची पत्नीला
सूचना केली. त्यास विरोध केला असता
माळशिकारे व पतीनेही तिला लाथाबुक्क्यांनी
मारहाण केल्याचे पिडीतेने तिच्या फिर्यादित नमूद
केले आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत.
No comments:
Post a Comment