लाकडी-बारामती रोडवर झालेल्या अपघातात निष्पाप मयुरचा मृत्यू तर एक जखमी..महिना होऊन गेला तरी वाहन मालक अटक नाही? बारामती:- गेल्या महिन्यात लाकडी-बारामती रोडवर चारचाकी वाहनाने टू व्हीलर ला जोरदार धडक दिली या दरम्यान टू व्हीलर वरील दोघेजण गंभीर जखमी झाले तर रस्त्याच्या कडेला असणारा जाड लोखंडी फलक देखील वाकला होता तो तात्काळ का हटविण्यात आला हे समजू शकले नाही, याबाबत सविस्तर माहिती अशी की,या अपघातातील सुरज अतिष चव्हाण वय-19 वर्षे, धंदा-शिक्षण, रा. लाकडी ता इंदापुर जि पुणे यांचे गिरीराज हॉस्पीटल बारामती येथे औषधोपचारा करीता अँडमीट असताना घेतलेल्या जबाबवरून अतिष हा 12 वी इयत्तेत भवानीनगर येथे गोविंदराव पवार विद्या प्रतिष्ठाण शाळेमध्ये शिक्षण घेत आहे.दि. 10/06/2022 रोजी सायंकाळी
05/00 वा चे सुमारास बारामती रेल्वे स्टेशन येथुन लाकडी ता इंदापुर जि पुणे येथे जाण्यासाठी माझा भाचा मयुर बापु रूपनवर वय 15 वर्षे रा लाकडी ता इंदापुर जि पुणे याची पल्सर मोटार सायकल नं-mh-42-3161 हिचेवरुन निघालो होतो. मोटार सायकल मी स्वत चालवित होतो. व भाचा मयुर बापु रुपनवर हा माझे पाठीमागील सिटवर मोटार सायकलवर बसला होता. आमची मोटार सायकल लाकडी गाव पास करुनखंडोबाचा माळ येथे आलो असता घोळवेवस्तीकडुन बारामती रस्त्याकडे जाणारी चारचाकी कार नं MH-42-H-5832 हिचेवरील चालकाने आमचे मोटार सायकलीस पाठीमागील बाजुने धडक बसुन अपघात झाला अपघातानंतर आम्ही दोघे मोटार सायकल वरुन खाली पडलो सदर अपघातात मला उजवे मांडीस,उजवे गुडघ्याचे नडगीस डावे खांद्यास डावे कपाळावर दुखापती झाल्या तसेच भाचा मयुर बापु रुपनवर याचे डोक्यास व हातापायास गंबीर दुखापती झाल्या असुन त्या कारमधील लोकांनी आम्हाला पुढील उपचाराकरीता बारामती येथील डॉ भोईटे यांचे हॉस्पीटल मध्ये आणुन अँडमीट केले. माझा भाचा मयुर बापु रुपनवर हा बोलण्याचे परीस्थितीत नव्हता त्यास लगेच डाँ भोईटे यांचे हॉस्पीटल मधुन दुस-या हॉस्पीटल मध्ये शिफ्ट केले आहे. सदरचा अपघात हा चारचाकी वाहन क्र MH-42-H-5832 यावरील चालकाचे चुकीमुळे झालेला आहे. सदर अपघात केलेल्या चारचाकी चालकाचे नाव पत्ता मला माहीत नाही,
नमुद वेळी पो.ना. थोरात ब.नं. 1413कळविले की, वालचंदनगर पोलीस स्टेशन गु. रजि. नं.279/2022 भा.द.वि.कलम 279,337,338, मो.वा.का. क. 184 प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयातील जखमी मयुर बापु रूपनवर, वय 15 वर्षे,रा. लाकडी,
इंदापुर, जि. पुणे याचेवर ससुन हॉस्पिटल येथे औषध उपचार चालू असताना तो मयत झाला असलेबाबत कागदपत्र वालचंदनगर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने दाखल गुन्हयास भा.द.वि. कलम 304 (अ) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे तसा रिपोर्ट मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. इंदापुर यांना रवाना केला असल्याचे नोंद झाली अधिक तपास चालू आहे,याबाबतीत अद्याप ही वाहनचालक/मालक अटक नाही अपघाताची घटना घडून महिना उलटून गेला तरी अटक होत नाही तर वाहनचालक कोण आहे हे माहीत नाही असे पोलिसांनी सांगितले असल्याचे मयत मयूर याचे नातेवाईक आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगत आहे तर या घडलेल्या अपघातात घातपात तर नाहीना असे देखील पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख व इतर ठिकाणी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हंटले आहे या घटनेत मयूर रुपनवर हा गंभीर जखमी झाला होता तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना मूर्त्यूशी झुंज देत असताना अखेर त्याचा 3/7/2022 रोजी मयत झाला तो शिक्षण घेत होता त्याच्या कुटुंबात तो एक लाडका होता दिसायला रूपवान असलेला हा मुलगा त्याच्या अश्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती,तो या जगात नाही राहिला त्याच्या आत्माला शांती लाभो, त्याच्या उपचारासाठी तुटपुंजी रक्कम दिली ती जर व्यवस्थित मिळाली असती तर त्यांचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाला असता व तो कदाचित वाचला असता अश्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून पोलीस आपले कर्तव्य बजावतील व योग्य न्याय होईल असे मत व्यक्त होत आहे.***
No comments:
Post a Comment