*वारकऱ्यांच्या वाहनांना बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळणार पथकर सवलत प्रमाणपत्र*
बारामती, दि. ८: आषाढी वारीतील १० मानाच्या पालख्या, वारकरी व भाविकांच्या वाहनांना पंढरपूरला जाणाऱ्या मार्गावर ७ ते १५ जुलै या कालावधीत राज्य शासनाने पथकर माफी जाहीर केली असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे अशा वाहनांना पथकर सूटबाबतचे सवलत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.
आषाढी वारीतील मानाच्या पालख्या, वारकऱ्यांची व भाविकांची वाहने ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग/ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकावर ७ ते १५ जुलै या कालावधीत पथकरातून सूट देण्याबाबत परिवहन विभागाने आदेश जारी केले आहेत.
No comments:
Post a Comment