पत्नीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा..! बारामती:- पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्यामुळे आरोपीस बारामती येथील कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली दिनांक ०७/०७/२०२२ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. ५ मा जे.ए. ख
गो यांनी बारामती येथील जावेद बबलू पठाण मूळ रा. मादकगाव, ता. खेर, जि. अलीगड, राज्य
उत्तरप्रदेश, हल्ली रुई, ता. बारामती, जि. पुणे यांस पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी
जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी
ठोठावली आहे.थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २३/०६/२०१७ रोजी आरोपी जावेद बबलू पठाण याने पत्नी नामे मिना जावेद पठाण हिच्याशी घरातील खर्चावरून व पैजच्या कारणावरून सतत वाद होत होते त्यामुळे दिनांक २३/०६/२०१७ रोजी नेहमीप्रमाणे जेवण करुन आरोपी व त्याची पत्नी मयत मिना जावेद पठाण हे रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास ते राहत असलेल्या मोरया अपार्टमेंट, रूम नं. ३ कई पाटी येथील टेरेस वरती झोपायला गेले व रात्री त्या दोघांमध्ये पैजच्या कारणांवरून वाद झाला. आरोपी याने चिडून जावून रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून खून केला,त्यानंतर त्याबाबत दि. २४/०६/२०१७ रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये सरकारी पक्षातर्फे बाळासाहेब बाबूराव सोनवलकर, पोलीस हवालदार बक्कल नं. ३१२ नेमणूक बारामती तालुका पो.स्टे. यांनी सदर आरोपी विरुद्ध सरकारपक्षातर्फे फिर्याद दिली होती.गुन्हयाचा तपास तात्कालीन सहा. पोलीस निरीक्षक पी. व्ही. काळे यांनी तपास करून कोर्टात दोषरोपपत्र दाखल केले होते.
सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासले. सदर खटल्या कामी
साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी काम पाहिले. केसमध्ये फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून मे न्यायालयाने भा.द.वि. कलम ३०२ अन्वये वरीलप्रमाणे आरोपीस जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अयो शिक्षा ठोठावली आहे.सदर प्रकरणी बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे
मार्गदर्शनाखाली महिला सहा. पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांनी केस अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच त्यास पोलीस हवालदार अभिमन्यू ज. कवडे यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच एन. ए. नलवडे सहा. पोलीस उपनिरीक्षक यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment