संतांच्या पालखी मध्ये माजी सैनिकांचा बंदोवस्त
बारामती :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या मध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून माजी सैनिकांनी चोख बंदोवस्त करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
जय जवान माजी सैनिक संघटना,बारामती यांच्या माध्यमातून अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वात पालखी सोहळ्यात ३९ माजी सैनिक व १९ माजी सैनिक महिला बचत गट सदस्या यांचा विशेष सहभाग होता
२८ जून रोजी बारामतीत आगमना पासून नागवडे वस्ती ते शारदा प्राणंग येथपर्यंत पालकी भोवती दोन्ही बाजुने सुरक्षा कवच प्रदान करत ग्रामस्थांना पालखीचे दर्शन माजी सैनिक व माजी सैनिक महिला बचत गट सदस्या यांनी शिस्तबद्ध दर्शन घडवण्यात पोलिस प्रशासनास सहकार्य केले.
२९ जून रोजी शारदा प्रागंण ते लिमटेक पर्यंत बंदोवस्त चे चोख काम केले या वेळी उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक व इतर अधिकारी उपस्तित होते
कोरोनाच्या काळात, विविध निवडणूका,आदी प्रसंगी पोलिसांबरोबर बंदोवस्त केल्यानंतर पालखी साठी माजी सैनिकांनी केलेले कार्य आदर्शवत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले
No comments:
Post a Comment