प्रा. निलेश आढाव यांना डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर...
पुणे ( विशेष प्रतिनिधी):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. शैक्षणिक विभागांचे उपकुलसचिव चंद्रकांत आढाव यांचे चिरंजीव डॉक्टर निलेश चंद्रकांत आढाव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येथे 13 जुलै रोजी दिल्ली येथे मुक्त धारा ऑडिटोरियम गोल मार्केट येथील भव्य सभामंडपामध्ये देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य
अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा यांनी देशाचे माजी उपपंतप्रधान बाबूजी जीवन राम यांच्या 36व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रीय समर्पण दिनाचे आयोजन केल्याची व देशातल्या विविध राज्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक आदी क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल विशेष सेवा कर्मींचा त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रा. गोरख साठे यांनी आपले मत वार्तालाप करताना प्रतिपादन केले . मुगुटराव साहेबराव काकडे कॉलेज सोमेश्वरनगर येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून प्रा. निलेश आढाव सध्या कार्यरत आहे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य चेअरमन सतीश भैय्या काकडे यांनी निलेश आढाव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यानंतर त्यांची विशेष अभिनंदन आणि कौतुक करून आशीर्वाद दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर देविदास वायदंडे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांनी प्राध्यापक निलेश आढाव यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असल्यामुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
विद्यार्थी शिक्षक पालक यांच्याकडून त्यांचे विशेष अभिनंदन केले प्राध्यापक निलेश आढाव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाल्याने आपले मत त्यांनी प्रतिपादन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा भारतरत्न पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असल्याचे मत प्रतिपादन केले सर्व स्तरातून प्रा.आढाव यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक लेखणीने वादग्रस्त न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन..!
No comments:
Post a Comment