कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेणे गरजेचे :सुनेत्रा पवार
जिजाऊ भवन मध्ये महिलां साठी होम मिनिस्टर संपन्न
बारामती :- विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी होत आहे अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे व त्यांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले
मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा. उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रातील महिलांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून मनोरंजन, खेळ, समाज प्रबोधन पर उखाणे, सामान्य ज्ञान वर आधारित प्रश्न मंजुषा,गाणी, नृत्य,फुगडी वर आधारित अनिल सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 24 जुलै रोजी जिजाऊ भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या
या वेळी आमदार अमोल मिटकरी, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, नगरसेविका नीलिमा मलगुंडे व किशोर मासाळ, अभिजित चव्हाण, दीपक मलगुंडे, संदीप बांदल व इतर मान्यवर उपस्तित होते.
प्रभाग क्रमांक तीन मधील विविध विकासकामे उत्कृष्ट पद्धतीने करताना
महिलांना व्यक्त होणे साठी व महिलाच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव व भक्ती जाधव आणि प्रभाग क्रमांक तीन मधील महिलांनी आतापर्यंत आयोजित केलेले विविध कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले
पवार साहेबाच्या पुण्यभूमीत दादाच्या वाढदिवसांनिमीत्त महिलांसाठी आयोजित केलेले उपक्रम आदर्शवत असून आशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बारामती कर महिला भाग्यवान असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले
प्रभागात 13 कोटी चे विकास कामे केलेली असताना चूल व मूल संकल्पनेच्या पलीकडे जाऊन महिलांसाठी वर्षभरात कार्यक्रम घेणे ही जवाबदारी असून होम मिनिस्टर च्या माध्यमातुन ती समर्थ पणे पार पाडत आहोत असे भक्ती अभिजीत जाधव यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
होम मिनिस्टर मध्ये प्रथम क्रमांक अंजली वणवे,
दुसरा क्रमांक प्रियांका गावडे व तिसरा क्रमांक लता जाधव यांनी पटकवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पैठणी व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले सहभागी 1100 महिलांना भेट वस्तू देण्यात आली
नलिनी पवार, कारंडेताई, वैशाली जगताप, हेमलता परकाळे आदींनी सदर कार्यक्रम यशस्वी होणे साठी विशेष परिश्रम घेतले
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार नितीन जाधव यांनी मानले
No comments:
Post a Comment