जय जवान च्या वतीने 'कारगिल विजय दिन 'साजरा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 26, 2022

जय जवान च्या वतीने 'कारगिल विजय दिन 'साजरा

जय जवान च्या वतीने 'कारगिल विजय  दिन 'साजरा 

बारामती : - बारामती तालुक्यातील जय जवान आजी माजी सैनिक संघटना च्या वतीने 23 वा कारगिल विजय दिवस (मंगळवार 26 जुलै ) उत्साहात साजरा करण्यात आला. भिगवन चौक येथील  हुतात्मा स्मारक  ला पुष्पचक्र वाहण्यात आले  शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी प्रांताधिकारी दादासो कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, चित्रपट अभिनेते घनःश्याम येडे व जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष  हनुमंत निंबाळकर,  भरत जाधव,  विलास कांबळे,  भारत मोरे,  रमेश रणमोडे,  अभय थोरात, राहुल भोईटे, संतोष तोडकर, श्रीमती वैशाली मोरे , सोपान बर्गे व बचत गट महिला प्रतिनिधी व  आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आजी व माजी सैनिक यांच्या बदल समाज्यात व प्रत्येक शासकीय कार्यालयात आदर ठेवला पाहिजे,त्यांची अडवणूक होता कामा नये हीच खरी त्यांच्या कार्याची पावती आपण देशवासीय देऊ शकतो असे  प्रांताधिकारी दादासो कांबळे यांनी सांगितले.विदेशात  ज्या प्रमाणे आजी माजी जवानांचा समाज्यातील प्रत्येक घटक आदर करतो तोच किंवा त्यापेक्षा जास्त आदर भारतात वाढला पाहिजे असे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले. 
26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तान वरती कारगिल युद्धात विजय प्राप्त केला.या युद्धातील शहीद वीर जवानांना स्मरण करून त्यांच्या बलिदानाची शौर्याची आठवण म्हणून हा दिवस नवीन पिढीसाठी देश प्रेमाची नवचेतना निर्माण  करावी म्हणून साजरा करण्यात येतो असे संघटनेचे  अध्यक्ष हनुमंत निबांळ्कर यांनी सांगितले.भारत माता की जय, तिरंगे की शान हर जवान, देशभक्तीवर घोषणा देण्यात आल्या 
प्रस्तावीक  निवृत्त सुबेदार मेजर रवींद्र लडकत यांनी केले.आभार राहुल भोईटे यांनी मानले 


No comments:

Post a Comment